स्वाक्षरीसहीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करणं लालूंना भारी पडणार?

गुन्हेगारीच्या आरोपांतील दोषी तुरुंगातून सोशल मीडिया कसा हाताळतो?

Updated: Apr 19, 2019, 11:39 AM IST
स्वाक्षरीसहीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करणं लालूंना भारी पडणार? title=

पाटणा : जनता दल युनायटेडनं (JDU) लालू यादव यांच्यावरून 'राष्ट्रीय जनता दला'वर (RJD) जोरदार हल्ला चढवलाय. जेडीयू प्रवक्ते नीरज कुमार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय. यात त्यांनी, आरजेडीचे अध्यक्ष कोणत्या अधिकारानं आरजेडी उमेदवारांना चिन्हं वाटत आहेत? तुरुंगात असताना त्यांची भेट घेण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते पण मग ते उमेदवारांना चिन्हं कसे काय वाटत आहेत? असा प्रश्न या पत्रात विचारण्यात आला आहे. 

रुग्णालयात उपचार घेत असताना... 

निवडणूक आयोगानं या प्रकरणात कारवाईक करण्याची मागणी नीरज कुमार यांनी केलीय. आरजेडटी अध्यक्ष लालू प्रसाद यादव भ्रष्टाचार प्रकरणी रांचीच्या होटवार तुरुंगात बंद आहेत. आरोग्यासंबंधीची कारणं पुढे करत ते रिम्स, रांचीच्या पेईंग वार्डमध्ये उपचार घेत आहेत. 

अधिक वाचा - आजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...

तुरुंगाच्या नियमांनुसार, लालूंना केवळ कुटुंबीयांची भेट घेण्याची परवानगी आहे. लालू यादव यांना आठवड्यातून एकदा - शनिवारी भेटण्यासाठीही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेत. परंतु,  नीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लालू एका पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि लोकसभा निवडणुकीत ते आपल्या स्वाक्षरीसहीत तिकीट वाटपही करत आहेत. त्यांनी तिकीट वाटपासाठी, त्यांच्यावर स्वाक्षरी करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतलीय का? असा सवालही त्यांनी विचारलाय. जर लालूंनी अशी परवानगी न्यायालयाकडून घेतली नसेल तर त्यांनी वाटलेल्या तिकीटांवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अर्ज बाद ठरवण्यात यावेत, असंही त्यांनी म्हटलंय.

नियमांची पायमल्ली?

या प्रकरणी नियमांची अवहेलना करण्यात आली असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती नीरज कुमार यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय.

गुन्हेगारीच्या आरोपांतील दोषी तुरुंगातून सोशल मीडिया कसा हाताळतो?

लालू यादव हे गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपांचे दोषी आहेत... जन आंदोलनाचे नेते म्हणून ते तुरुंगात नाहीत. तुरुंगात असतानाही लालू यादव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विचार प्रकट करताना दिसतात. त्यांचं ट्विटर हॅन्डल दुसरी एखादी व्यक्ती हाताळत असेल तर त्यांनी हेदेखील सांगावं की लालू प्रसाद यादव तुरुंगातून त्यांना आपले विचार कसे सांगतात? असे अनेक प्रश्न नीरज यादव यांनी उपस्थित केले आहेत.