नवी दिल्ली : गंभीर गुन्हा केलेल्या मनुष्यास तुरूंगवासाची शिक्षा झाल्याचे प्रकार आपण पाहिले असतील. पण एखाद्या प्राण्याला अशाप्रकारची शिक्षा झाल्याचे कधी ऐकले आहे का ? कजाखस्तानच्या कोस्टनी जेलमध्ये एक अस्वल सध्या शिक्षा भोगत आहे. कजाखस्तानच्या कोस्टनी जेलमध्ये 729 कैदी आहेत. यामध्ये एक अस्वल देखील आहे. एका क्षुल्लक कारणामुळे मादी अस्वल सध्या तुरूंगवास भोगत आहे. कैट्या असे या मादी अस्वलाचे नाव असून ते सध्या आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे. मुक्या प्राण्यांना दया दाखवण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जातात पण अशावेळी कैट्यासारख्या प्राण्यांकडे कोणाचे लक्ष जात नाही हे दुर्देव म्हणावे लागेल.
या कैट्या अस्वलाला इतकी गंभीर शिक्षा का झाली असेल ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. इतका कोणता मोठा गुन्हा या अस्वलाने केला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण ही मादा अस्वल आताच नव्हे तर 2004 पासून तुरूंगात आहे. कैट्याने दोन माणसांवर हल्ला केला होता. तेव्हापासून कैट्याला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागत आहे. त्याला आजीवन तुरूंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली.
असे असले तरी कैट्या लहानपणापासूनच खूप प्रसिद्ध आहे. सर्कसवाल्यांनी कैट्याला आपल्या परिवारापासून दूर करत पिंजऱ्यात कैद केले होते. येणारी लोकं कैट्याला पिंजऱ्यात खायला देत असत. यानंतर एका बालक कैट्याला काहीतरी खायला देण्यासाठी पुढे सरसावला. आणि कैट्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि तो वादात फसला. पुढे काही दिवस गेले त्यानंतर पुन्हा अशी एक घटना घडली. एका तरुणावरही कैट्याने हल्ला केला. पण ज्याच्यावर हल्ला केला तो दारुच्या नशेत होता आणि कैट्याला त्रास देत होता. पण या सर्वाची शिक्षा सध्या कैट्या भोगत आहे.