कर्नाटक सत्तासंघर्ष : जेडीएसचे ते दोन आमदार गायब

कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर म्हणजेच जेडीएसमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे.

Updated: May 16, 2018, 12:54 PM IST
कर्नाटक सत्तासंघर्ष : जेडीएसचे ते दोन आमदार गायब title=

बंगळुरू : कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर म्हणजेच जेडीएसमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. यात मात्र जेडीएसला धक्का देणारी बातमी आली आहे. कारण जेडीएसच्या बैठकीत २ आमदार पोहोचलेले नाहीत, राजा व्यंकटप्पा आणि व्यंकट राव हे दोन आमदार बैठकीला पोहोचलेले नाहीत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या जेडीएससाठी हा जबर धक्का मानला जात आहे. 

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी कुमारस्वामींची भेट घेतल्याची चर्चा बंगळुरूत आहे. जावडेकर कुमारस्वामी राहत असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडले. त्यामुळे भाजपनं जेडीएसला सत्तेत सहकारी बनवण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जात आहे. 

दुसरीकडे गुलाम नबी आझाद या काँग्रेस नेत्याने आरोप केला आहे की, भाजपाकडून काँग्रेस आमदारांना इनकम टॅक्स आणि ईडीच्या धाडी टाकण्याची धमकी दिली जात आहे. एचडी देवेगौडा यांचे चिरंजीव रेवण्णा यांनी भाजपावर घोडेबाजारीचा आरोप केला आहे, आमदारांना १०० कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.