बंगळुरु : कर्नाटकात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा भाजपने दावा केल्यानंतर आता काँग्रेस नेते एम.बी पाटील यांनी देखील मोठा दावा केला आहे. भाजपचे 6 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार असेल तर आम्हीही मागे राहणार नाही असं एम. बी. पाटील यांनी म्हटलं आहे. एम. बी. पाटील हे सिद्धरामैय्या सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेसने आमदार फुटू नये म्हणून खबरदारी घेतली आहे. कलबुर्गी, बिदर या भागातील काँग्रेस आमदाराना आणण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने विशेष विमान पाठवलं आहे.
बेळ्ळारीमधील आमदार फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपचे माजी मंत्री आणि खाण माफिया जनार्दन रेड्डी आणि भाजपा खासदार श्रीरामलु यांचा बेळ्ळारीमध्ये मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप आता खेळी करतं हे पाहावं लागणार आहे.