Bisleri Mineral Water : पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी दुकानात गेलं की, आपण एक बिस्लेर द्या असं प्रत्येकजण म्हणतो. मग त्या पाण्याच्या बाटलीचा ब्रँड कोणताही असो, तो आपल्यासाठी बिस्लेरीच असते. बिस्लेरीचा हा इतिहास भारतात सुमारे 5 दशकांचा आहे. बिस्लेरीला भारतात बाटलीबंद पाणी विकण्याच्या उद्योगात लोकप्रिय करण्याचे श्रेय उद्योजक रमेश चौहान यांना जात. बिस्लेरी पाण्याची बाटली भारतात मोठ्या प्रमाणात विकत घेतली जाते. याचदरम्यान बिसलेरी कंपनीची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) ने अधिग्रहण प्रक्रियेतून माघार घेतल्याने बिस्लेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान हा कारभार सांभाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले की, जयंती आमच्या व्यावसायिक टीमसोबत कंपनीच्या कामकाजाकडे लक्ष देईल आणि आता आम्हाला आमचा व्यवसाय विकायचा नाही. तसेच बिस्लेरीच्या प्रमोटर्सला या करारातून एक अब्ज डॉलर मिळण्याची अपेक्षा होती. दोन्ही कंपन्यांमध्ये मूल्याकंन करण्याविषयी सहमती झाली नाही.
वाचा: Aishwarya च्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला; 'या' व्यक्तींवर संशय
42 वर्षीय जयंती चौहान सध्या तिच्या वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षा आहेत. जयंती यांनी हायस्कूल पूर्ण केल्यानंतर लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइझिंग (FIDM) मध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा अभ्यास केला. त्यानंतर Istituto Marangoni Milano येथे फॅशन स्टाइलिंगचा पाठपुरावा केला. त्यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये पात्रता देखील मिळवली आहे.
जयंती अँजेलो जॉर्जच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक व्यवस्थापन टीमसोबत काम करेल. 82 वर्षीय चौहान यांनी या वर्षाच्या सुरुवातीला हा ब्रँड टाटा समूहाला अंदाजे 7000 कोटी रुपयांना विकला. भारतातील सर्वात मोठ्या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडसोबतचा करार टाटा कंझ्युमरच्या अनिश्चयतेमुळे रद्द करण्यात आला.
मूल्यांकनाबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. टाटा कंझ्युमरने दोन वर्षांपूर्वी चौहान कुटुंबाशी चर्चा सुरू केली होती. परंतु गेल्या आठवड्यात चर्चा रद्द केली. जयंती गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायाशी संबंधित आहे. बिस्लेरीच्या पोर्टफोलिओचा भाग असलेला वेदिका ब्रँड अलीकडच्या काही वर्षांत त्यांचे लक्ष केंद्रीत करत आहे.