नवी दिल्ली: फ्लिपकार्डने सॉफ्टबँक व्हिजन फंडातून सुमारे २.५ अरब डॉलर्स इन्व्हेस्ट केले होते. या इन्व्हेस्टमेंटबरोबर जपानची मोठी कंपनी सॉफ्टबँक ही भारतातील प्रमुख ई-वाणिज्य कंपन्यामधील सगळ्यात अधिक शेयर्स असलेली कंपनी झाली आहे. फ्लिपकार्डच्या इन्व्हेस्टमेंटची ठोस रक्कम त्यांनी जाहीर केली नाही. परंतु, भारतातील औद्यागिक कंपन्यांमधील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. या इन्व्हेस्टमेंटबरोबरच १०० अरब डॉलर्सचे व्हिजन फंड फ्लिपकार्डमध्ये सगळ्यात मोठे शेयरधारक झाले आहेत.
सॉफ्टबँक व्हिजन फंड:
या कराराशी संबंधित असलेल्या लोकांनी असे सांगितले की, साधारण २.५ डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट केली जाईल. त्यापैकी १.५ अरब डॉलर फिल्पकार्डमध्ये इन्व्हेस्ट केले आणि १ अरब डॉलर टाइगर ग्लोबल मॅनेजमेंटचा हिस्सा आहे. 'सॉफ्टबँक व्हिजन फंड' हे जगातील सगळ्यात मोठे औदयोगिक केंद्र आहे आणि त्यामुळे या इन्व्हेस्टमेंटबरोबर फ्लिपकार्डला कमीत कमी २०% सहभाग मिळेल.