नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी एकत्र पत्रकार परिषद घेतली. भारत आणि जपानने दहशतवादाच्या मुद्यावर कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान शिंजो अबे यांनी मुंबई हल्ला आणि पठानकोट हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांच्या भारत भेटी दरम्यान जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारताला बुलेट ट्रेन दिली तर पाकिस्तान सुनावलं. मुंबई आणि पठानकोटमधील दहशतवादी हल्ल्यांमधील दोषींना पाकिस्तानने शिक्षा द्यावी. त्यांनी दहशतवादावर टीकाही केली आणि संपूर्ण जगामध्ये शांती असावी अशी इच्छा व्यक्त केली.
त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान शिंजो आबे यांनी उत्तर कोरियाच्या अणू चाचणी आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचा देखील जोरदार निषेध केला.
दोन्ही देशांनी दहशतवादी संघटना अल कायदाचा, ISIS, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांविरोधात संयुक्त सहकार्य अजून मजबूत करण्यावर जोर दिला आहे. शिंजो आबेंनी भारतासोबत मैत्रीवरही भर दिला आहे. त्यांनी सांगितले की, जपान आणि भारत यांच्यातील सहकार्य केवळ द्विपक्षीय नाही, आता विशेष रणनीतिक आणि वैश्विक भागीदारी ही विकसित झाली आहे. भारत आणि जपान स्वातंत्र्य, लोकशाही, मानवी हक्क आणि कायदा या मूलभूत मूल्यांचा स्विकार करतात.