नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेते येथील स्थानिक तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतात. अशा नेत्यांमुळेच येथील स्थानिक तरुणाई रस्त्यावर जवानांवर दगडफेक करतात आणि देशविरोधी घोषणा देतात. पण आता याच नेत्यांची पोलखोल झाली आहे. गृहमंत्रालयाने फुटीरतावादी नेत्यांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये त्यांची मुले कोठे काय करतात याची माहिती दिली आहे.
1. निसार हुसैन (वहीदत ए इस्लामी) - यांचा मुलगा आणि मुलगी इराणमध्ये काम करतात.
2. बिलाल लोन - यांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत आहे.
3. अशरफ सहरई (चेअरमन, तहरीक-ए-हुर्रियत) - दोन्ही मुलं सऊदी अरबमध्ये काम करतात.
4. जीएम. भट्ट (आमिर ए जमात) - मुलगा सऊदी अरबमध्ये डॉक्टर आहे.
5. आसिया अंद्राबी (दुख्तरान-ए-मिल्लत) - एक मुलगा मलेशियात तर दुसरा ऑस्ट्रेलियामध्ये शिकत आहेत.
6. मोहम्मद शफी रेशी - मुलगा अमेरिकेत पीएचडी करत आहे.
7. अशरफ लाया (तहरीक ए हुर्रियत) - मुलगी पाकिस्तानमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत आहे.
8. जहूर गिलानी (तहरीक ए हुर्रियत) (सैयद अली शाह यांचा जावई) – मुलगा सऊदी अरबच्या एयरलाइंसमध्ये काम करतो.
9. मीरवाइज उमर फारूक (हुर्रियतचे चेअरमन) – बहिण अमेरिकेत राहते.
10. मोहम्मद युसूफ मीर (मुस्लीम लीग) - पाकिस्तानमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत आहे.
हे सगळे नेते काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्याचं काम करतात. तरुणांना देशविरोधात भडकवतात. काश्मीरमध्ये हे नेते नेहमी बंदची हाक देत असतात.
यापैकी अनेक नेते सध्या नज़रकैदेत आणि काही ताब्यात आहेत. या नेत्यांना दिली गेलेली सरकारी सुरक्षा देखील मोदी सरकारने काढून घेतली आहे.