श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज सुरक्षादलाने एका दहशतवादी ठिकाणावर छापा टाकत एका व्यक्तीला अटक केली आहे. सुरक्षादलाने छापा टाकलेल्या ठिकाणाहून काही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांना कुलगामा जिल्ह्यातील यारीपोरा भागातील एक घर दहशतवाद्यांचे ठिकाण असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, सीआरपीएफच्या टीमने या भागात शोधमोहीम सुरू केली आणि घरावर छापा टाकला. या शोधमोहिमेवेळी घरातून ग्रेनेड, दारूगोळा आणि काही हत्यारे जप्त करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी यारीपोरा येथे राहणाऱ्या अय्यूब राठेरला अटक केली आहे.
J&K Police: On a credible input, a joint party of Police & security forces busted a hide-out in a residential house at Kulgam's Yaripora area and recovered arms & ammunition including grenades & live rounds on March 12.
— ANI (@ANI) March 13, 2019
J&K Police: Police has registered a case in the matter and investigation has been initiated. One person Mohammad Ayoub Rather of Yaripora has been arrested in this connection. https://t.co/UZertDbMpV
— ANI (@ANI) March 13, 2019
२४ फेब्रुवारी रोजी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या एका चकमकीत एक पोलीस उपाध्यक्ष, एक जवान शहीद झाला होता. तसेच जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादीही ठार झाले होते. पोलिसांना या भागात दहशतवाद्यांचा एक समूह असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.