श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाला निशाणा करण्यात येत आहे. मंगळवारी पुन्हा दहशतवाद्यांकडून बडगाम जिल्ह्यातील पाखेरपोरा भागात सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 181व्या बटालियनमधील दोन जवान आणि चार स्थानिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांकडून झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून घेराबंदी करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
सीआरपीएफचे पीआरओ पंकज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पाखेरपोनामधील मार्केटमध्ये एका रेशन डेपोजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यांनी सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. तर 4 नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
#Update Unknown terrorists hurled grenade on the troops of 181 battalion of CRPF at Pakharpora, Budgam, today. 1 CRPF personnel sustained minor splinter injuries, 4 civilians injured in the incident: CRPF https://t.co/GeDZMykU3s
— ANI (@ANI) May 5, 2020
जखमींना उपचारासाठी पाखेरपोरामधील सब-डिस्ट्रिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं, त्यापैकी दोन सुरक्षा रक्षक आणि चार नागरिक आहेत. चार नागरिकांना पुढील उपचारासाठी श्रीनगरमधील रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
सीआरपीएफ, पोलीस आणि सेनेच्या एका संयुक्त टीमने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
दरम्यान, शनिवारी रात्रीपासून जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा परिसरात दहशदवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीत पाच भारतीय जवान शहीद झाले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलांना यश आलं. हंदवाडा येथील एका घरात दहशतवादी लपून बसले होते. घरातील लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. त्यांची सुटका करण्यााठी राष्ट्रीय रायफसल्चे चार जवान आणि एक पोलीस अधिकारी घरात शिरले. मात्र, घरात आधीपासून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. भारतीय जवानांकडूनही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात २१ व्या राष्ट्रीय रायफल्सचे पाचही जवान शहीद झाले.