भारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 13, 2018, 05:22 PM IST
भारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. 

यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनीही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. 

तर दोन दहशतवादी पसार झालेत. या दोन्ही दहशतवाद्यांचा जवानांकडून शोध सुरु आहे. दरम्यान, चकमकीत तर सोपोरमध्ये रात्री उशिरा झालेल्या चकमकीत पोलीस जाविद अहमद हे शहीद झालेत.