नवी दिल्ली : देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या जमीनीवरून दशतवादी संघटना जैश ए मोहम्मद भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. सूत्रांच्या मते, जैशचे 5 दहशतवादी PoK मार्गाने जम्मू आणि काश्मिरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
गुप्तचर यंत्रणांचा इशारा
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येत आहे. आमचे सहयोगी वृत्तसंकेतस्थळ Zee News कडे अलर्टची प्रत आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, जैश ए मोहम्मदचे 5 दहशतवादी पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये आहेत.
सुरक्षा जवानांना लक्ष
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अलर्टच्या मते दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष करू शकतात. दहशतवाद्यांनी सलग LoC जवळ रेकी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हा अलर्ट गांभीर्याने घेतला आहे. अफगानिस्तानमधील बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत