...म्हणून लोक इवांकाला ट्विटरवर 'आमच्या गल्लीतही भेट दे'चं आवाहन करतायंत

इवांका ट्रम्प सध्या भारत दौर्‍यावर आली आहे. हैदराबादमध्ये 'जागतिक उद्योजक परिषदे'मध्ये तिनं सहभाग घेतला आहे. 

Updated: Nov 29, 2017, 11:58 AM IST
...म्हणून लोक इवांकाला ट्विटरवर 'आमच्या गल्लीतही भेट दे'चं आवाहन करतायंत  title=

मुंबई : इवांका ट्रम्प सध्या भारत दौर्‍यावर आली आहे. हैदराबादमध्ये 'जागतिक उद्योजक परिषदे'मध्ये तिनं सहभाग घेतला आहे. 

इवांका  हैदराबादमध्ये असल्याने तिच्या सुरक्षेसाठी, प्रवासासाठी आणि वास्तव्यासाठी खास सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

रस्स्त्यांची डागडुजी 

इवांका ज्या परिसरात आहे. तेथील भागात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.  

इवांकाच्या येण्याने हा बदल अवघ्या काही दिवसांत करण्यात आल्याने  स्थानिकांनी यावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

 

अनेकांनी ट्विटरवर याबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत. काहींनी थेट इवांकाला त्याच्या परिसरात भेट देण्याची विनंती केली आहे.  

 

एका स्थानिक नेत्याने ट्विटा करताना लिहलंय की सध्या हैदराबादमध्ये दोन प्रकारचे रस्ते आहेत. एक तर 'इवांका ट्रम्प रोड' तर दुसरा 'सामान्य रोड' आहे. यावरून तुम्ही इवांकासाठी किती प्रमाणात सुरक्षा आणि स्वच्च्छता वाढवली असेल याचा विचार करू शकता.