ITR Filing: राहिले फक्त 3 दिवस; अन्यभा भरावा लागू शकतो 5 हजारांचा दंड, काय असतो Belated ITR?

How To File Belated ITR: आर्थिक वर्ष 202-24 साठी आयकर परतावा (Income Tax Return) दाखल कऱण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. आयकर परतावा दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 29, 2024, 12:30 PM IST
ITR Filing: राहिले फक्त 3 दिवस; अन्यभा भरावा लागू शकतो 5 हजारांचा दंड, काय असतो Belated ITR? title=

How To File Belated ITR: तुम्ही आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर परतावा ((Income Tax Return) दाखल केला नसेल तर तुमच्याकडे शेवटचे तीन दिवस आहेत. आयकर परतावा दाखल करण्यासाठी 31 जुलै अंतिम तारीख आहे. जर तुम्ही अंतिम तारखेआधी आयकर परतावा दाखल करु शकला नाहीत तर तुमच्याकडे फक्त Belated ITR दाखल करण्याचा पर्याय असेल. अनेकांना आपण 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करु शकलो नाही, तर काय होईल याची चिंता सतावत आहे. पण तुमच्या माहितीसाठी, Belated ITR भरताना तुम्हाला दंडही भरावा लागतो. हा Belated ITR नेमका काय असतो आणि तो कोण भरु शकतं? हे जाणून घ्या. 

Belated ITR म्हणजे काय असतं?

Belated ITR म्हणजे काय असतं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच (What is Belated ITR)?. जेव्हा करदात्याला शेवटच्या तारखेपर्यंत आयकर परतावा दाखल कऱणं शक्य होत नाही, तेव्हा त्याच्याकडे Belated ITR दाखल करणे हा एकमेव पर्याय असतो. म्हणजेच, जेव्हा कोणी शेवटच्या तारखेनंतर आयटीआर फाइल करतो, तेव्हा त्याला Belated ITR म्हणतात.

Belated ITR भरण्याचे तोटे

तर तुम्ही Belated ITR दाखल केला तर सर्वात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला विलंब झाल्याचा दंड भरावा लागतो. जर तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR भरताना 1000 रुपये दंड भरावा लागेल. लक्षात ठेवा की तुमची कर देयता शून्य असली तरीही तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल.

कोणी आणि कधी दाखल करु शकतं?

त्याच्या नावावरूनच स्पष्ट आहे, ते लोक (Who can file Belated ITR) जे शेवटच्या तारखेपर्यंतही आयटीआर दाखल करू शकत नाहीत. तो कधी भरायचा याचं उत्तरही नावातच आहे. शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर तुम्ही Belated ITR दाखल करु शकता. 

Belated ITR कसा भरायचा?

Belated ITR सामान्य आयटीआर प्रमाणेच (How to file Belated ITR) भरला जातो. तथापि, सामान्य ITR आयकर कायद्याच्या कलम 139(1) अंतर्गत दाखल केला जातो, तर विलंबित ITR कलम 139(4) अंतर्गत दाखल केला जातो. उर्वरित प्रक्रिया सामान्य ITR भरण्यासारखीच राहते.