लस घ्या, नाहीतर घरातच कैद व्हाल!

जर आता तुम्ही लस घेतली नसेल तर तुमच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध येतील. 

Updated: Jan 2, 2022, 08:04 AM IST
लस घ्या, नाहीतर घरातच कैद व्हाल! title=

जयपूर : जर तुम्ही अजून देखील कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल तर ती त्वरित घ्या. कारण जर आता तुम्ही लस घेतली नसेल तर तुमच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध येतील. देशभरात कोरोना संख्या वाढत असल्याने राजस्थान सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. शनिवारी केवळ एका दिवसात जयपुरमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनचे एकूण 200 प्रकरणं समोर आली आहेत.

राजस्थानमध्ये ओमायक्रॉनच्या 52 प्रकरणांची नोंद

शनिवारी राजस्थानमध्ये एकूण 52 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये जयपूरमध्ये 38 प्रकरणं, प्रतापगढ, सिरोही, बीकानेरमधून 3-3 प्रकरणं, जोधपूरमधून 2 अजमेल, सीकर, भीलवाडा याठिकाणी 1-1 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

नव्या वर्षापासून घराबाहेर पडण्यावर निर्बंधांची तयारी

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की, जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना लसीचे डोस दिले गेले पाहिजेत. तसंच ज्या व्यक्ती लस घेत नाहीत त्यांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात यावे. 

कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता 3 जानेवारीला शाळा कॉलेज बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. राजस्थान सरकारने नवीन वर्ष साजरं करण्यावर कोणतेही निर्बंध लावले नव्हते. 

शुक्रवारी देशात कोरोनाचे 22,775 रुग्ण आढळले आहेत, तर 406 जणांचा मृत्यूंची नोंद करण्यात झाला आहे. सध्या देशात कोरोनाचा एक्टिव्ह रुग्णसंख्या 1,04,781 आहे. तर रिकव्हरी रेट 98.32% वर आहे.