अर्थव्यवस्थेला मजबूत करताहेत IT कंपन्या; Infosys करणार 55,000 कर्मचाऱ्यांची भरती

it companies in india : कोरोना काळातही भारतीय आयटी कंपन्यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे म्हणणे आहे की चालू आर्थिक वर्षात 55,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल.

Updated: Jan 13, 2022, 10:59 AM IST
अर्थव्यवस्थेला मजबूत करताहेत IT कंपन्या; Infosys करणार 55,000 कर्मचाऱ्यांची भरती title=

मुंबई : कोरोना काळातही भारतीय आयटी कंपन्यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे म्हणणे आहे की चालू आर्थिक वर्षात 55,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल.

इन्फोसिस देणार 55,000 नोकऱ्या 

आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निलांजन रॉय म्हणतात की कंपनीचा टॅलेंट पूल वाढवणे आणि त्यात सुधारणा करणे याला कंपनीचे प्राधान्य आहे. कंपनीच्या ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत,, कंपनी 2022-2023 या आर्थिक वर्षात 55,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

आयटी कंपन्या नफ्यात

TCS, Infosys आणि Wipro सारख्या मोठ्या कंपन्यांनी बुधवारी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. या तिन्ही कंपन्यांना ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये प्रचंड नफा झाला आहे. त्याचप्रमाणे TCS ने या कालावधीत. 9,769 कोटी आणि विप्रोने 2,970 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.

महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढली

Infosys ने माहिती दिली की डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,49,312 होती, जी डिसेंबर 2021 मध्ये वाढून 2,92,067 झाली. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 39.6% महिला कर्मचारी आहेत.

त्याचप्रमाणे, टीसीएसने सांगितले की त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5,56,986 झाली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, विप्रोचे एकूण कर्मचारी संख्या 2,31,671 इतकी आहे. या तिमाहीत 41,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.

TCS ने आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर 7 रुपये आणि विप्रोने प्रति शेअर 1 रुपये लाभांश जाहीर केला आहे.