Govt Job: दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

ISRO Recruitment 2024:  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 27, 2024, 03:54 PM IST
Govt Job: दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज title=
ISRO Recruitment 2024

ISRO Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. यासाठी इस्रोकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) अंतर्गत वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे आयटीआय/बीएससी/डिप्लोमा इन इंजिनिअरिंग/बीई/बीटेक/एमई/एमई/एमटेक/एमएससी पदवी असणे आवश्यक आहे.

पगार

इस्रोतील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 65 हजार 554 रुपये ते  81 हजार 906 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. अर्ज करणाऱ्या आरक्षित उमेदवारांकडून 250 रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 750 रुपये इतके प्रक्रिया शुल्क आकारले जाईल,याची नोंद घ्या. या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर याची माहिती कळवण्यात येईल.

पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार 

असा करा अर्ज

इस्रो भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट  www.ursc.gov.in वर जा. त्यानंतर  करिअर सेक्शनवरली रिक्रूटमेंटवर क्लिक करा. यानंतर Apply online वर क्लिक करा.
आता तुमचे सर्व तपशील भरा आणि डॉक्यूमेंट अपलोड करा. अर्ज भरल्यानंतर प्रिंटआउट घ्या. 

अर्जाची शेवटची तारीख

12 फेब्रुवारी 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास, चुकीची माहिती आढळल्यास तसेच दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा