भारताने रचला इतिहास! ISRO ने गगनयान मिशनचं लाँचिग करुन दाखवलं, ठरला चौथा देश

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच केली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आलं होतं. पण इस्रोने तात्काळ हा बिघाड दुरुस्त करत मोहीम यशस्वी करुन दाखवली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 21, 2023, 10:27 AM IST
भारताने रचला इतिहास! ISRO ने गगनयान मिशनचं लाँचिग करुन दाखवलं, ठरला चौथा देश title=

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच केली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आलं होतं. पण इस्रोने तात्काळ हा बिघाड दुरुस्त करत मोहीम यशस्वी करुन दाखवली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता हे लाँचिग पार पडलं. गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश 2025 मध्ये 3 दिवसांच्या मिशनअंतर्गत माणसांना पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवलं जाणं आणि नंतर सुरक्षित पृथ्वीवर परत आणणं आहे. हे क्रू मॉड्यूल समुद्रात सुरक्षितपणं उतरवलं जाणार आहे. अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरला आहे. 

याला  टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 (Test Vehicle Abort Mission -1) म्हटलं जातं. तसंच याला टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाइंट (TV-D1) असंही बोललं जातं. हे टेस्ट व्हेईकल अंतराळवीरासाठी तयार करण्यात आलेल्या क्रू मॉड्यूलला आपल्यासह अवकाशात गेलं. या रॉकेट क्र्यूने मॉड्यूलला घेऊन साडे सोळा किमी वर गेल्यानंतर बंगाल खाडीत लँडिंग केलं. ही मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा इस्रोने केली आहे. 

आज सकाळी 7.30 वाजता टेस्ट फ्लाइटला लाँचिंग केलं जाणार होतं. पण हवामान खराब असल्याने वेळेत दोन वेळा बदल करण्यात आला होता. यानंतर 8 वाजता लाँचिंग होणार होतं. पण त्यानंतर वेळ बदलून 8.45 करण्यात आली. अखेर हे लाँचिंग स्थगित करण्यात आलं होतं. अखेर 10 वाजता लाँचिंग करण्याची ठरली.

गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश 2025 मध्ये 3 दिवसांच्या मिशनअंतर्गत माणसांना पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवलं जाणं आणि नंतर सुरक्षित पृथ्वीवर परत आणणं आहे. भारतीय अंतराळवीर म्हणजेच गगनॉट क्रू मॉड्यूलमध्ये बसतील आणि पृथ्वीभोवती 400 किलोमीटर उंचीवर कमी कक्षेत फिरतील. ISRO आपल्या चाचणी वाहन - प्रात्यक्षिक (TV-D1), सिंगल स्टेज लिक्विड प्रोपल्शन रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रयत्न करणार आहे. क्रू मॉड्युलसह हे चाचणी वाहन मिशन संपूर्ण गगनयान कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.