भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द करण्यात आलं आहे. उड्डाणासाठी फक्त 5 सेकंद शिल्लक असताना हे लाँचिंग थांबवण्यात आलं. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी यावेळी इंजिनमधील इंधनाने पेट न घेतल्याने गगनयानचं लाँचिंग रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यापूर्वी हवामानामुळे 8 वाजता होणारं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अतंराळ केंद्रातून गगनयानच्या क्रू मॉड्यूलचं लाँचिंग होणार होते. पण हे लाँचिंग आता टळलं आहे.
VIDEO | Gaganyaan Test Vehicle - Demonstration (TV-D1) test flight launch put "ON HOLD" at T-5 seconds, ISRO chief says the launch shall be rescheduled very soon. pic.twitter.com/fbZJhLK0GN
— Press Trust of India (@PTI_News) October 21, 2023
इस्रो प्रमुखांनी हे मिशन रद्द करण्यात आल्याची माहिती देताना, नेमकी काय चूक केली याची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे. "टेस्ट व्हेईकल पूर्णपणे सुरक्षित आहे. इंजिन इग्निशन झालं नाही. नेमक्या काय चुका झाल्या याचं विश्लेषण इस्रो करणार असून, त्या दुरुस्त केल्या जातील. काही कारणास्तव स्वचलित लाँचमध्ये बाधा आली, संगणकाने लाँचिंग रोखलं. आम्ही मॅन्यूअल पद्धतीने चुकांचं विश्लेषण करु," असं इस्रो प्रमुख म्हणाले.
#WATCH | Gaganyaan’s First Flight Test Vehicle Abort Mission-1 (TV-D1) launch on hold
ISRO chief S Somnath says, The lift-off attempt could not happen today...engine ignition has not happened in the nominal course, we need to find out what went wrong. The vehicle is safe, we… pic.twitter.com/wIosu113oT
— ANI (@ANI) October 21, 2023
याला टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 (Test Vehicle Abort Mission -1) म्हटलं जात होतं. तसंच याला टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाइंट (TV-D1) असंही बोललं जात होते. आज जर याचं लाँचिंग झालं असतं तर, टेस्ट व्हेईकल अंतराळवीरासाठी तयार करण्यात आलेल्या क्रू मॉड्यूलला आपल्यासह अवकाशात घेऊन गेलं असतं. हे रॉकेट क्र्यू मॉड्यूलला घेऊन साडे सोळा किमी वर गेल्यानंतर बंगाल खाडीत लँड करणार होतं.
गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश 2025 मध्ये 3 दिवसांच्या मिशनअंतर्गत माणसांना पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवलं जाणं आणि नंतर सुरक्षित पृथ्वीवर परत आणणं आहे. हे क्रू मॉड्यूल समुद्रात सुरक्षितपणं उतरवलं जाणार आहे. या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असं करणारा चौथा देश ठरणार आहे.
भारतीय अंतराळवीर म्हणजेच गगनॉट क्रू मॉड्यूलमध्ये बसतील आणि पृथ्वीभोवती 400 किलोमीटर उंचीवर कमी कक्षेत फिरतील. ISRO आपल्या चाचणी वाहन - प्रात्यक्षिक (TV-D1), सिंगल स्टेज लिक्विड प्रोपल्शन रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रयत्न करणार आहे. क्रू मॉड्युलसह हे चाचणी वाहन मिशन संपूर्ण गगनयान कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.