ISRO Job Notification | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; 63 हजार रुपये महिना पगार

 जर तुम्ही 10 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे

Updated: Aug 29, 2021, 01:08 PM IST
ISRO Job Notification | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; 63 हजार रुपये महिना पगार title=

मुंबई : जर तुम्ही 10 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ISRO  लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटरतर्फे लाइट व्हेहिकल ड्रायवर, कुक, फायरमन तसेच अन्य पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 6 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता.

इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटरने (LPSC) 10 वी पास उमेदवारांसाठी त्यामध्ये जड वाहन चालक 2 पदे, हलके वाहन चालक 2 पदे, कुक 1 पद, फायरमॅन 2 पदे, कॅटरिंग अटेंडंटचे 1 पद याकरीता जाहिरात प्रसिद्द झाली आहे.

उमेदवारांसाठी शैक्षणिक योग्यता
जर तुम्हाला या नोकरी साठी अप्लाय करायचे असेल, तर 10 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. जड वाहन चालकाला कमीत कमी 5 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. 

कुक पदासाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवाराकडे हॉटेल किंवा कॅंटिंनमध्ये 5 वर्षे काम करण्याचा अनुभव असायला हवा. 

जर तुमची निवड या पदांसाठी  झाली तर तुम्हाला दरमहिना 18 हजारापासून ते 63 हजारापर्यंतचा पगार मिळू शकतो. हा पगार वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा असू शकतो.

अर्ज करा
LPSCच्या अधिकृत वेबसाईटवर(https://www.lpsc.gov.in/noticeresult.html#Demo2) जारी नोटिफिकेशन नुसार अप्लाय करणे गरजेचे असेल.