नवी दिल्ली : इस्रायलच्या दुतावासाजवळ झालेल्या स्फोटात भारताच्या आयबीकडूनही तपास सुरु झाला आहे. पण यात आता इस्रायलच्या मोसाद यंत्रणेची उडी घेतली आहे. सध्या या स्फोटाचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. इस्रायल दूतावासाजवळ झालेल्या स्फोटाचं इराण कनेक्शन समोर येतं आहे. तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीतून स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे संकेत मिळात आहेत.
स्फोटानंतर पोलिसांकडून आता इराणी नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. त्याचसोबत सर्व हॉटेलांशी संपर्क साधून तिथे राहणाऱ्या इराणी नागरिकांबाबत चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून घटनास्थळाचे सीसीटीव्हीही तपासण्यात आलं. स्फोटानंतर दोन संशयित कॅबमधून उतरून संशयास्पदरित्या फिरताना दिसत आहेत. याप्रकऱणी कॅब चालकांचीही चौकशी करण्यात येत आहे.
जगातील सर्वात ताकदवान गुप्तचर संस्था मोसाद या प्रकरणाच्या चौकशीत भारताला मदत करणार आहे. इस्त्रायली राजदूताच्या नावे प्राप्त झालेल्या पत्रात या स्फोटाचे वर्णन 'ट्रेलर' असे केले आहे. त्यात म्हटले आहे की, इराणी सैन्य कमांडर सुलेमानी आणि इराणचे अणू वैज्ञानिक मोहसिन फखरजादेह याचा बदला घेतला जाईल.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे एक पथकही दिल्ली ब्लास्ट प्रकरणात चौकशी करत आहे. गुन्हे शाखेला संशय आहे की गुन्हेगारांनी ऑनलाइन कॅब बुकिंगच्या माध्यातून हा स्फोट केला असेलय म्हणून अब्दुल कलाम रोडवर ब्लास्टपासून ते 3 किमी पर्यंत किती लोकांनी टॅक्सी बूक केली होती. याची माहिती घेतली जात आहे.
या संदर्भात ऑनलाइन कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी ओला (ओएलए) आणि उबर (यूबीईआर) यांच्याशी संपर्क साधला जात आहे.