Isha Ambani Romantic Video: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे नुकतेच मुंबईत (NMACC Lunch 2023) धमाकेदार ओपनिंग झाले. यावेळी मोठमोठ्या कलाकारांना हजेरी लावली होती. बॉलिवूडचं काय तर हॉलिवूडच्याही मोठमोठ्या सेलिब्रेटींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती परंतु यावेळी अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. ईशा अंबानी असाच एक लक्षवेधी व्हिडीओ (isha Amabani at NMACC) सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. यामध्ये ईशाचा नवरा आनंद पिरामल ईशाच्या हातावर किस करताना दिसतो आहे आणि त्याचक्षणी ईशा लाजते.
तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये ईशाचा क्यूटनेस सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहून ईशाचा क्यूटनेस तुमच्या नजरेतून निसल्याशिवाय राहणार नाही. (isha ambani romantic video goes viral on internet as husband anand piramal kisses her on hand she blushes)
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला (Bollywood Celebs at NMACC) राजकारण्यांपासून ते बॉलिवूड स्टार्स, हॉलिवूड स्टार्स आणि मोठ्या बिझनेस टायकून्सनी हजेरी लावली होती. यावेळी आमिर खान, दिपिका पादूकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबिय यांनी हजेरी लावली होती. संपुर्ण अंबानी कुटुंबियांचाही यावेळी उपस्खिती पाहायला मिळाली होती. राधिका मर्चंट, अनंत अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल, आकाश अंबानी श्लोका अंबानी आणि खुद्द नीता व मुकेश अंबानी यांची हजेरी होती.
यावेळी ईशाच्या व्हिडीओनं मात्र सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. ईशा आणि आनंद एकमेकांच्या किती प्रेमात आहेत याचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे आणि या व्हिडीओखाली अनेक जण गोड अशा कमेंट्सही करताना दिसत आहेत. कॅमेरामननं या व्हिडीओमध्ये ईशाच्या चेहऱ्यावरील भाव टिपले आहेत. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, ईशा आनंद एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यानंतर आनंद तिचा हात हातात घेतो व तिच्या हातावर किस (Anand Kisses Isha Ambani at NMACC) करतो तेव्हा ईशा लाजते आणि हेच तिच्या चेहऱ्यावर भाव सध्या सगळ्यांचीच मनं जिंकून घेत आहेत.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ईशा सुंदर असा क्रीम-ह्यू रंगाची साडी परिधान केली आहे. यावर तिनं अनारकली जॅकेट घेतले होते. तर सुंदर अशी डायमंडची ज्वेलरी परिधान केली होती. ईशा आणि आनंदचे 2018 साली लग्न झाले त्यांना आता जुळी गोंडस मुलंही आहेत.