अरबपतीची लेक असूनही ईशा अंबानीची 'ही' सवय खूप काही शिकवून जाते; बघा तुम्हालाही जमतंय का...

श्रीमंती आहे, म्हणून करा खर्च... अशा स्वभावाची ती मुळीच नाही.

Updated: Jun 30, 2022, 11:22 AM IST
अरबपतीची लेक असूनही ईशा अंबानीची 'ही' सवय खूप काही शिकवून जाते; बघा तुम्हालाही जमतंय का...  title=
isha ambani dressing style repeating clothes

मुंबई : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे, मुकेश अंबानी. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी नुकतंच रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ज्यानंतर मुलगा आकाश अंबानी याच्या नावे संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. (isha ambani dressing style repeating clothes)

यामागोमागच अंबानींच्या कुटुंबातून आणखी एक माहितीसुद्धा समोर आली. आता मुकेश अंबानी त्यांची लेक ईशा अंबानी हिच्याकडे रिलायन्स रिटेलच्या अध्यक्षपदी नियुक्त करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

सध्या ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या Director पदाचा कार्यभार सांभाळत आहे. तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये गेल्यावर ज्या ट्रेंड्स (Trends) च्या दुकानात जाऊन कपड्यांची खरेदी करता, त्या ब्रँडची सर्व सूत्र येत्या काळात ईशाच्या हाती असणार आहेत. 

एका अरबपती व्यक्तीची लेक आणि घरात गडगंज श्रीमंती असतानाही ईशाच्या काही सवयी तिला सर्वांहून खास ठरवतात. मुख्य म्हणजे व्यवसाय कसा करावा आणि स्वत:ची ओळख चारचौघात कशी तयार करावी, याचीच शिकवण तिच्या कृतीतून मिळत आहे. 

ईशा स्वत: एका कपड्यांच्या ब्रँडमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत असली तरीही ती एकच कपडे पुन्हापुन्हा वापरण्यावर भर देते. श्रीमंती आहे, म्हणून करा खर्च... अशा स्वभावाची ती मुळीच नाही. 

ईशानं स्वत:च्या लग्नाच्या वेळीसुद्धा तिच्या आईचीच साडी नेसली होती. अभिनेता अरमान जैन याच्या लग्नाच्या वेळीसुद्धा तिनं वापरलेलाच एक लेहंगा घातला होता. कपडे पुन्हापुन्हा वापरण्यात गैर काहीच नाही, हेच ईशा तिच्या या कृतीतून नकळत सिद्ध करताना दिसते. 

श्रीमंत असणं म्हणजे वारेमाप खर्च करणं, आलिशान आयुष्य जगणं असा जर तुमचा समज असेल तर, अंबानी कुटुंबातील सदस्यांच्या या सवयी नक्कीच त्याला अपवाद आहेत असं म्हणायला हरकत नाही.