नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता IRCTC च्या माध्यमातून ६ पेक्षा जास्त तिकीट बूक करता येतील.
यासाठी ग्राहकांना केवळ आपलं आधार कार्ड IRCTC खात्याशी लिंक करावं लागेल. IRCTC नुसार, प्रवाशांना जर एका महिन्यात ६ पेक्षा जास्त तिकीटे बूक करायची असतील तर, IRCTC अकाऊंट आधारसोबत लिंक करायचं आहे. आता एका महिन्यात ६ पेक्षा जास्त तिकीटे बूक करण्याच सुविधा नाहीये.
IRCTC ने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एका महिन्यात ६ पेक्षा जास्त तिकीटे बूक करायची असेल तर आधार कार्ड खात्याशी लिंक करावे. आधारसोबत खातं लिंक केल्यानंतरही प्रवाशी एका महिन्यात १२ पेक्षा जास्त तिकीटे बूक करू शकणार नाहीयेत.
RCTC खाते आधारसोबत लिंक करण्यासाठी लॉगीन केल्यानंतर होमपेजवर प्रोफाईल सेक्शनमध्ये जा, इथे Aadhaar KYC वर क्लिक करा. त्यासोबतच तुम्ही महत्वाची माहिती तिथे भरा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्स मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचे आधार डिटेल्स समोर येतील. ते सबमिट करा. असे केल्यानंतर तुमचं आधार खात्याशी लिंक होईल.