गुन्हेगारही हीच्या नावाने थरथर कापतात; अशी एक IPS जिने बॉलिवूडमध्येही केलंय काम

एवढंच नाही तर त्यांनी बॉलिवूडमध्येही काम करून आपली एक वेगळी ओळख याआधीच निर्माण केली आहे. 

Updated: Oct 24, 2022, 11:23 PM IST
गुन्हेगारही हीच्या नावाने थरथर कापतात; अशी एक IPS जिने बॉलिवूडमध्येही केलंय काम title=

दिल्ली : UPSC ची परीक्षा पास करणं आणि IPS अधिकारी म्हणून ट्रेनिंग पार पाडणं काही सोपी गोष्ट नसते. मात्र, तिने ते करून दाखवलं आहे. भोपाळच्या IPS अधिकारी सिमला प्रसाद यांनी हे दुहेरी  केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी बॉलिवूडमध्येही काम करून आपली एक वेगळी ओळख याआधीच निर्माण केली आहे. एक IPS अधिकारी आणि बॉलिवूडमध्ये काम करणं तसं कठीणच. मात्र 2010 बॅचच्या IPS अधिकारी सिमला प्रसाद यांनी हे यश संपादन केलं आहे. चला जाणून घेऊयात याच मल्टी टॅलेंटेड सिमला प्रसाद यांच्याबाबत...  

सिमला प्रसाद यांचा जन्म 08 ऑक्टोबर 1980 रोजी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये झाला. सिमला यांना लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती. त्यांनी शाळेत असताना कायम अभिनय किंवा नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. सिमला यांनी आपल्या कॉलेजमध्येही विविध नाटकांमध्ये काम केलं. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हे स्वतः IAS अधिकारी तर मातोश्री मेहरून्निसा परवेज या नावाजलेल्या साहित्यकार आहेत

सिमला यांचं सुरुवातीचं शिक्षण सेंट जोसेफ कोएड शाळेत झालं. यानंतर त्यांनी स्टुडंट्स फॉर एक्सिलन्स (IEHE) मधून वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यांनी आपलं पुढील शिक्षण बारकतुल्लाह विश्वविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पूर्ण केलं. परीक्षेत उत्तुंग कामगिरी गेल्याने त्यांना गोल्ड मेडलने त्यांचा गौरवही करण्यात आला. यानंतर त्यांनी मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाची MP PSC परीक्षा पास झाल्यात.

PSC परीक्षेनंतर सिमला यांची पहिली पोस्टिंग DSP म्हणून झालेली, या नोकरीदरम्यानच त्यांनी UPSC परीक्षा दिली आणि पहिल्या फटक्यात यश देखील मिळवलं. उल्लेखनीय बाब म्हणजे सिमला यांनी UPSC परीक्षेसाठी कोणताही क्लास लावला नाही. सिमला यांचं म्हणणं आहे की त्यांनी काही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा कधीही विचार केला नव्हता, मात्र घरातील वाटावारांमुळे त्यांच्यात IPS अधिकारी बनण्याची इच्छा निर्माण झाली.