मुंबई : डोडला डेअरी (Dodla Dairy)आणि कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेज(KIMS)चा आयपीओचा आजचा शेवटचा दिवस आहे. 16 जुन रोजी हे दोन्ही आयपीयो खुले करण्यात आले होते. दोन्ही आयपीयोला चांगला रिस्पॉंस मिळाला आहे. विशेषतः डोडला डेअरीचा आयपीओ दुसऱ्या दिवशी 3.3 पट सबस्क्राइब झाला आहे. तसेच KIMSच्या आयपीओला 56 टक्के सबस्क्रिप्शन मिळाला आहे. आज हा आयपीओ देखील पूर्ण भरू शकतो. तुम्ही हे आयपीओ भरण्यास इच्छुक असाल तर, आजचा शेवटचा दिवस आहे.
Dodla Dairy चा आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. लिलावाच्या दुसऱ्याच दिवशी हा आयपीयो 3.3 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
डोडला डेअरीला या आयपीओच्या माध्यमातून 520 कोटी रुपयांचे भांडवल उभे करायचे आहे.
KIMS IPO:
कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेजच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांचा कल मिश्र स्वरुपाचा दिसून आला. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी हा आयपीयो 56 टक्के सबस्क्राइब झाल्याचे दिसून आले आहे. कृष्णा इंन्स्टिट्युट या आयपीओच्या माध्यमातून 2144 कोटी रुपये उभे करण्याचा नियोजन आहे.