25 वर्षात कोट्यधीश; गुंतवणुकीसाठी 12-15-20 चा फॉर्म्युला ठेवा लक्षात अन् व्हा श्रीमंत!

Investment Plans: नोकरीकरुनही अनेक स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यासाठी बचत आणि गुंतवणुकीचं काही स्मार्ट पर्याय शोधावे लागतात. जर तुम्ही 12-15-20 चा फॉर्म्युनुसार गुंतवणुक केली तर नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 22, 2024, 02:34 PM IST
25 वर्षात कोट्यधीश; गुंतवणुकीसाठी 12-15-20 चा फॉर्म्युला ठेवा लक्षात अन् व्हा श्रीमंत!   title=

Investment Plans In Marathi: आयुष्यात प्रत्येकाला आपण श्रीमंत असावे असं वाटतं असतं. तर काहीजण हक्काचे घर मिळवण्यासाठी धडपडत असतो, तर काहीजण स्वत: चे स्वप्न करण्यासाठी पैशांची गुंतवणुक करत असतात. एवढं करुन ही पैशाअभावी स्वप्न साकाराता येत नाही. तसेच तुम्ही फक्त नोकरी करून घर चालवू शकता पण करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी काही स्मार्ट पर्याय शोधावे लागतील. जर तुम्हाला कोट्याधीश बनण्याचा असेल तर ही आम्ही काहीसा सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी मदत होईल.

वाढत्या महागाईच्या काळात गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे अशा ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे जिथे त्यांना बंपर परतावा मिळणार असेल. आजच्या बाजारातील अनिश्चिततेच्या काळातही पैसे वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत, जे तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करतील. परंतु जर तुम्ही योग्य मार्गाने गुंतवणूक केली तर तुम्ही कमी वेळातही करोडपती देखील होऊ शकता. यासाठी तुम्ही 12-15-20 चा फॉर्म्यूला वापरु शकता. हा फॉर्म्यूला कसा वापयरचा ते जाणून घ्या... 

12-15-20 काय आहे हा फॉर्म्यूला

तज्ञांच्या मते, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षांसाठी किमान 20,000 रुपये सरासरी 12% व्याजदरासह गुंतवले तर एखादी व्यक्ती करोडपती होऊ शकते. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला वार्षिक सरासरी 12% परतावा मिळू शकतो. म्हणजेच 12 रिटर्न्स झाले, 15 वर्षे झाली आणि 20 हजार रुपये गुंतवले. अशा प्रकारे 12-15-20 हा फॉर्म्यूला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

कोणत्या फंडात गुंतवणूक करावी?

गुंतवणुकदारांसाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी, एखाद्याने कोणत्या प्रकारच्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करावी याबद्दल गोंधळ होऊ शकतो. तज्ञांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंडाचे पर्याय उत्तम दीर्घकालीन परतावा देतात. या फंडातून तुम्हाला 12% वार्षिक परतावा मिळू शकतो. अब्जाधीश होण्यासाठी गुंतवणूकदारांना कोअर-सॅटेलाइट गुंतवणूक धोरण स्वीकारावे लागेल.

गुंतवणूक चक्र समजून घ्या

कोणत्याही मालमत्तेचे काही कालावधीसाठी वचन दिले जाते. कधी कधी शेअर बाजार चांगला परतावा देतो तर कधी बँक FD देखील व्याजदर वाढल्यावर चांगला परतावा देते. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना कधीकधी रिअल इस्टेटमध्ये चांगल्या संधी मिळतात. यामुळे गुंतवणूकदारांनी नेहमी गुंतवणुकीचे चक्र समजून घेतले पाहिजे. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.

कोणत्या फंडात गुंतवणूक करावी?

गुंतवणुकदारांसाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी, एखाद्याने कोणत्या प्रकारच्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करावी याबद्दल गोंधळ होऊ शकतो. तज्ञांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंडाचे पर्याय उत्तम दीर्घकालीन परतावा देतात. या फंडातून तुम्हाला 12% वार्षिक परतावा मिळू शकतो. अब्जाधीश होण्यासाठी गुंतवणूकदारांना कोअर-सॅटेलाइट गुंतवणूक धोरण स्वीकारावे लागेल. 
 

 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)