WAPCOS IPO : गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी; या सरकारी कंपनीचा आयपीओ आता बाजारात !

Wapcos proposed Initial Public Offering (IPO) : आणखी एक सरकारी कंपनी आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारच्या मालकीची ही कंपनी आहे. या इश्यूमध्ये, सरकार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 3.25 कोटी शेअर्स विकणार आहे. 

Updated: Sep 29, 2022, 08:24 AM IST
WAPCOS IPO : गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी; या सरकारी कंपनीचा आयपीओ आता बाजारात ! title=

Wapcos proposed Initial Public Offering (IPO) : आणखी एक सरकारी कंपनी आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारच्या मालकीची ही कंपनी आहे.  WAPCOS लिमिटेड असं या कंपनीचे नाव आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येणार्‍या WAPCOS लिमिटेडने त्यांच्या प्रस्तावित IPO साठी बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक कागदपत्रे दाखल केली आहेत. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपात असेल आणि त्यात कोणत्याही नवीन इश्यूचा समावेश नाही. या इश्यूमध्ये, सरकार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 3.25 कोटी शेअर्स विकणार आहे. 

WAPCOS लिमिटेड ही पूर्वी जल आणि ऊर्जा सल्लागार सेवा लिमिटेड म्हणून ओळखली जाते. ही भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या मालकीची कंपनी आहे. भारत सरकारच्या मालकीची सल्लागार सेवा पुरविणारी कंपनी आहे. ही कंपनी जलस्रोत, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सेवा पुरवते. 

कंपनीचा SEBI कडे अर्ज 

सार्वजनिक क्षेत्रातील WAPCOS Ltd या कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी ( Wapcos IPO) भांडवली बाजार नियामक सेबी (SEBI) कडे अर्ज केला आहे. सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP) आयपीओ अंतर्गत, कंपनीचे प्रवर्तक म्हणजे भारत सरकारद्वारे 32,500,000 इक्विटी शेअर्सची (32,500,000 equity shares) विक्री केली जाईल. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपात असणार आहे.

ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, ज्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त ऑफर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसतील, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेल्या संस्थागत बोली करणाऱ्यांसाठी ते उपलब्ध असतील.  ऑफरच्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध नसतील.

देशासह जगभारत अनेक प्रकल्प सुरु

गेल्या पाच दशकांमध्ये, WAPCOS आणि तिच्या उपकंपन्यांनी धरण आणि जलाशय अभियांत्रिकी, सिंचन, पूर नियंत्रण या क्षेत्रात भारत आणि परदेशात, विशेषतः दक्षिण आशिया आणि संपूर्ण आफ्रिकेत या कंपनीचे प्रकल्प सुरु आहेत. सध्या, त्यांचे 30 देशांमध्ये चालू असलेले प्रकल्प आहेत आणि पूर्ण झालेल्या आणि चालू असलेल्या 455 हून अधिक परदेशी प्रकल्पांशी संबंधित आहेत.