येथे गुंतवा पैसे, नोकरीआधी तुमची मुले होतील कोट्याधीश!

मुलांच्या भविष्याबाबत नेहमीच आईवडिलांना चिंता असते. वाढत्या महागाईमुळे आर्थिक बोजा वाढतच जातो. तज्ञांच्या मते जर आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांसाठी आर्थिक प्लानिंग सुरु केले तर मुलांचे करिअर सुरु होण्याआधी ते कोट्याधीश बनू शकतात. या फंडाद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले करिअर बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर घ्या जाणून

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 18, 2018, 09:01 AM IST
येथे गुंतवा पैसे, नोकरीआधी तुमची मुले होतील कोट्याधीश! title=

नवी दिल्ली : मुलांच्या भविष्याबाबत नेहमीच आईवडिलांना चिंता असते. वाढत्या महागाईमुळे आर्थिक बोजा वाढतच जातो. तज्ञांच्या मते जर आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांसाठी आर्थिक प्लानिंग सुरु केले तर मुलांचे करिअर सुरु होण्याआधी ते कोट्याधीश बनू शकतात. या फंडाद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले करिअर बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर घ्या जाणून

येथे करा गुंतवणूक

तज्ञांच्या मते, गुंतवणूक ही नेहमी दीर्घकाळासाठी असली पाहिजे. यामुळेच चांगले रिटर्न मिळतात. चांगले रिटर्न म्युच्युअल फंडमधून मिळतात. साधारण एक डझनाहून अधिक म्युच्युअल फंडनी गेल्या एका वर्षात ५० टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळालेत. दीर्घकाळासाठी या फंडचा रिटर्न १२ टक्क्यांहून अधिक राहिलाय. जर चांगल्या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर आरामात तुम्हालाा १२ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.

कसा वाढतो पैसा

तज्ञांच्या मते, अनेकदा लोक विचारतात की छोटीशी गुंतवणूक करोडपती कशी काय बनवू शकते. याचे उत्तर आहे सुरुवातीला छोट्याशा गुंतवणुकीतून कमी रिटर्न्स मिळतात. मात्र एकवेळ अशी येते की गुंतवणुकीपेक्षा रिटर्न्स अधिक मिळू लागतात. यानंतर हा फंड वेगाने वाढतो. गुंतवणूक पाचव्या वर्षात १.५ लाख रुपयांहून अधिक असेल. ही गुंतवणूक १०व्या वर्षात वाढून ५ लाखाहून अधिक असेल. त्यानंतर १५व्या वर्षात ही गुंतवणूक १६ लाखाहून अधिक होईल. २०व्या वर्षात ही वाढून ४२ लाखाहून अधिक होईल. २५व्या वर्षात ही गुंतवणूक १ कोटी रुपयांहून अधिक होईल. 

यावर टॅक्स लागणार का?

इनकम टॅक्स तज्ञांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा फायदा मिळतो. या फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षानंतर पूर्णपणे टॅक्स फ्री होतो. हा फायदा कितीही झाला तरी त्यावर कोणत्याही प्रकारे टॅक्स द्यावा लागत नाही. 

नोट : गुंतवणुकीचा सल्ला हा ब्रोकरेज हाऊस आणि मार्केट एक्सपर्ट्सद्वारे देण्यात आलाय. कृपया आपल्या स्तरावर अथवा आपल्या एक्सपर्ट्सकडून कोणत्याही प्रकारच्या सल्ल्यांची तपासणी करुन घ्या. मार्केटमध्ये गुंतवणूक ही जोखीम आहे. त्यामुळे सतर्कता गरजेची आहे.