Crime News In Marathi: सुनील लोहानी आत्महत्या प्रकरणात इंदूर पोलिसांनी त्याच्या पत्नीसह 7 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 4 जानेवारी पोजी सुनीलने त्याच्या सासरच्या घरासमोरच पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मात्र मृत्यूच्या आधी सुनीलने एक व्हिडिओ बनवला होता. तसंच सुसाइड नोटदेखील लिहली होती.लिहली होती. यात त्याने त्याच्या पत्नीला व तिचे कुटुंब यांच्यासह तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुरुवातीला सुनीलच्या पत्नीची व घरच्यांची चुक असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 4 जानेवारीच्या रात्री सुनील लोहानीने काटजू कॉलनी येथे असलेल्या त्याच्या सासरी जाऊन स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यात तो गंभीररित्या भाजला होता. जवळच्या लोकांनी त्याला एमवाय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीररित्या जखमी झाल्याने शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आत्मदहनाचा सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहेत.
मृत्यूच्या आधी सुनीलने एक व्हिडिओ बनवला होता आणि एक सुसाइड नोटदेखील लिहली होती. यात त्याने त्याच्या पत्नीसह तिच्या कुटुंबाला आणि तिच्या प्रियकराला जबाबदार धरले आहे. पोलिसांनी सुनीलची पत्नी रीना लोहनी, नातेवाईक शंकर कामरा, सीनेश कामरा, नन्हे कामरा, बाजी कामरा, सोनम कामरा आणि अशोक सचदेवा यांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलची पत्नी पाकिस्तानी महिला आहे. सुनीलसोबत लग्न करण्याआधी तिचे आधीच तीन लग्न झाले होते. सुनील तिचा चौथा पती होता. मात्र, तिला आता त्याच्यापासून घटस्फोट हवा होता. कारण ती अशोकसोबत सतत बोलायची. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिला अशोकसोबत चौथे लग्न करायचे होते. त्यासाठी तिला सुनीलसोबतच लग्न संपवायचे होते. सुनीलला तिच्या या कटाबाबत समजले. त्यानंतर त्यांच्यात अनेक वाद देखील झाले.
सुनीलचे 2018मध्ये लग्न झाले होते मात्र काही दिवसच त्यांचा संसार व्यवस्थित सुरु होता. लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांच्यात वाद होण्यास सुरु झाले. त्यानंतर सुनीलची पत्नी तिच्या माहेरीच राहायला लागली. नंतर तिचे अशोकवर प्रेम बसले. या सगळ्याबाबत सुनीलला कळल्यानंतर तो तिच्या घरी आला आणि घराबाहेरच स्वतःला पेटवून घेतले. यात 10 दिवसांच्या उपचारांनंतर त्याचा मृत्यू झाला.