इंडिगो एअरलाइन्स विरोधात 'देशद्रोहाचा' खटला

इंटरग्लोब एविएशनच्या एअरलाइन इंडिगोवरील संकट काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. 

Updated: Nov 21, 2017, 12:46 PM IST
 इंडिगो एअरलाइन्स विरोधात 'देशद्रोहाचा' खटला title=

नवी दिल्ली : इंटरग्लोब एविएशनच्या एअरलाइन इंडिगोवरील संकट काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. 

आता एअरलाइन्स विरोधात राष्ट्रदोहाचा खटला भरला आहे. नवी दिल्लीच्या सरोजनी नगरर पोलीस स्थानकात इंडिगोच्या विरोधात राष्ट्रदोहाचा खटला भरला आहे.  प्रमोद कुमार नावाच्या व्यक्तीने हा खटला भरला आहे. प्रमोद कुमार जैन यांचा आरोप आहे की, बंगलुरू - दुबई फ्लाइटमध्ये एअरलाइनने भारतीय चलन घेण्यास नकार दिला आहे. प्रमोद कुमार जैन झी मीडियाशी एक्सक्लुझिव चर्चा करून ही माहिती दिली आहे. भारतीय दंड संहितेच्या सेक्शन 124 A आणि नॅशनल ऑनर अॅक्ट १९७१ च्या अंतर्गत देशद्रोहाचा खटला टाकला आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण

प्रमोद कुमार १० नोव्हेंबर २०१७ रोजी बंगलुरू ते दुबई असा इंडिगो फ्लाइट नंबर 6E95 चे तिकिट घेतले. सकाळी ७.२० चे विमान होते. तिकिट बुक करताना त्यांनी त्यासोबत जेवण बुक केलं नव्हतं. त्यामुळे विमानात त्यांनी जेवणाची ऑर्डर केली, मात्र क्रू मेंबरने त्यावेळी त्यांना जेवण देण्यास नकार दिला. कारण प्रमोद कुमार भारतीय चलनाचा वापर करत असल्यामुळे हे झालं. त्यांचा असा आरोप होता की क्रू मेंबर्सने त्यांना विदेशी चलनात व्यवहार करण्यास सांगितले. 

काय आहे कंपनीची पॉलिसी 

प्रमोद कुमार यांनी यावर आक्षेप घेतला तेव्हा क्रू मेंबर्सने त्यांना पॉलिसी असल्याचं सांगितलं. एअरलाईन्सच्या मेन्यूमध्ये ऑरिजिन (जेथून विमान पकडत आहात) आणि डेस्टिनेशन (जेथे जात आहात) असलेल्या ठिकाणाच्या पैशांचा वापर करण्यास सांगितले. त्यानंतरही क्रू मेंबर्सने त्यांना डॉलर किंवा दिरहाममध्ये व्यवहार करण्यास सांगितले.