मोठी बातमी| IndiGo विमानाचं कराचीमध्ये Emergency Landing

एकाच महिन्यातील दुसरी घटना, कराचीमध्ये पुन्हा एकदा विमानाचं Emergency Landing

Updated: Jul 17, 2022, 10:27 AM IST
मोठी बातमी| IndiGo विमानाचं कराचीमध्ये Emergency Landing title=

नवी दिल्ली : इंडिगो विमानाला पाकिस्तानच्या कराचीत इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हे विमान शारजाहून हैदराबाद इथे जात होतं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. 

विमानातील प्रवाशांना दुस-या विमानानं हैदराबाद इथं आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन आठवड्यात दुस-यांदा भारतीय विमानाला कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्याची घटना घडली आहे. 

इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, शारजाह-हैदराबाद विमानाच्या पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारी म्हणून विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आलं. 

सध्या प्रवाशांना हैदराबादला आणण्यासाठी कराचीला जादा विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. याआधी 5 जुलै रोजी स्पाइसजेटचे विमान क्रॅश झाल्यानंतर कराचीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. 

 

स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबईला जात होते. या बिघाडानंतर विमानाला पाकिस्तानातील कराची येथे उतरावे लागले. स्पाईसजेटच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला नेण्यात आलं होतं.