भारतातील टॉप -10 श्रीमंत : देशात नव्हे तर आशियातही सर्वात 'कुबेर' या व्यक्ती

 हूरुन इंडियाच्या  (Hurun India) माहितीनुसार, भारताने 1,000 कोटी रुपयांची एकूण संपती असणारे 1,000 पेक्षा जास्त व्यक्ती असण्याचा गौरव प्राप्त केला आहे.  

Updated: Oct 2, 2021, 02:05 PM IST
भारतातील टॉप -10 श्रीमंत : देशात नव्हे तर आशियातही सर्वात 'कुबेर' या व्यक्ती title=

मुंबई :  Top 10 richest person : हूरुन इंडियाच्या  (Hurun India) माहितीनुसार, भारताने 1,000 कोटी रुपयांची एकूण संपती असणारे 1,000 पेक्षा जास्त व्यक्ती असण्याचा गौरव मिळवला आहे. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये 119 शहरांमधील 1,007 व्यक्तींची एकूण संपत्ती 1,000 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुकेश अंबानी

Mukesh Ambani

रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 7,18,000 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सलग 10 व्या वर्षी अव्वल स्थानावर आहेत. अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे 7,18,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संपत्ती 10 टक्क्यांनी वाढली आहे. रिलायन्सच्या किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायातील तेजीमुळे अंबानी कुटुंबाची संपत्ती वाढली आहे. मुकेश अंबानी हे केवळ भारताचेच नव्हे तर आशियातील सर्वात मोठे श्रीमंत आहेत.

गौतम अदानी

Gautam Adani

अदानी समूहाचे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची संपत्ती गेल्या एका वर्षात 3,65,700 कोटी रुपयांनी वाढून दररोज 1000 कोटी रुपयांनी वाढली आहे. अदानी कुटुंबाची मालमत्ता 261 टक्क्यांनी वाढून 5,05,900 कोटी रुपयांवरून 1,40,200 कोटी रुपये झाली आहे. यासह गौतम अदानी आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची मालमत्ता 3,65,700 कोटींनी वाढली आहे.

लक्ष्मी मितल

LN Mittal

या यादीत आर्सेलर मित्तल (ArcelorMittal) यांची लक्ष्मी मित्तल (LN Mittal)  पाचव्या स्थानावर आहे. लंडनमधील व्यापारी लक्ष्मी मित्तल आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात 187 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती आता 1,74,400 कोटी रुपये आहे. गेल्या 1 वर्षात त्याने दररोज 312 कोटी रुपये कमावले आहेत. या यादीत तो पहिल्यांदाच पहिल्या 10 मध्ये पोहोचले आहे.

सायरन पुनवाला

Cyrus S Poonawalla

सायरस पूनावाला (Cyrus S. Poonawalla सहाव्या क्रमांकावर आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सायरस पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या एका वर्षात दिवसाला 190 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि या काळात त्यांची संपत्ती 74 टक्क्यांनी वाढून 1,63,700 कोटी रुपये झाली आहे. त्यांची कंपनी कोरोना महामारी लस कोविशील्ड बनवत आहेत. यामुळे त्याच्या निव्वळ किमतीमध्ये खूप वाढ झाली आहे. सायरस पूनावाला गेल्या वर्षीही सहाव्या क्रमांकावर होते.

बायजू रवींद्रन

Byju Raveendran

बायजू लर्निंग अॅप चालवणाऱ्या बायजू रवींद्रन (Byju Raveendran) यांचे नावही हुरुन इंडियाच्या यादीत समाविष्ट आहे. 24,300 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तो या यादीत 67 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानुसार, ऑनलाइन कोचिंग सुविधा पुरवणाऱ्या भारताच्या एडटेक कंपनी बायजसचे मूल्य अंदाजे  16.5 अरब डॉलर आहे. कंपनी कोरोना विषाणूच्या युगात आपला व्यवसाय वाढवण्यात यशस्वी झाली आहे आणि तिने आपल्या व्यवसायाचे अनेक प्रतिस्पर्धी विकत घेतले आहेत. कंपनीने या वर्षी आतापर्यंत 15,000 कोटी रुपये अधिग्रहणावर खर्च केले आहेत.

एसपी हिंदुजा

S P Hinduja

हिंदुजा ग्रुपचे (Hinduja Group) एसपी हिंदुजा अँड फॅमिलीकडे 2,20,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती 53 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या क्रमवारीत 2 स्थानांनी घट झाली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी दररोज 209 कोटी रुपये कमावले. 85 वर्षीय एसपी हिंदुजा इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये राहतात.

राधाकिशन दमानी

Radhakishan Damani

DMart चालवणाऱ्या सुपर मार्केटचे  (Avenue Supermar) संस्थापक आणि ज्येष्ठ गुंतवणूकदार राधाकिशन दमानी 7 व्या क्रमांकावर आहेत. दमानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे 1,54,300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या वर्षभरात त्यांची संपत्ती 77 टक्क्यांनी वाढली आहे. या दरम्यान त्यानी दररोज 184 कोटी रुपये कमवले. गेल्यावर्षीही दमानी सातव्या क्रमांकावर होते.

संजीव बिखचंदानी

Sanjeev Bikhchandani

संजीव बिखचंदानी इन्फो एज इंडियाचे (Info Edge India) संस्थापक आहेत. नोकरी डॉट कॉम  (Naukri.com), 99 एर्क्स डॉट कॉम (99Acres.com), आणि शिक्षा डॉट कॉम (Shiksha.com) यासारख्या अनेक इंटरनेट-आधारित संस्था चालवतात. 29,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह, बिखचंदानी या यादीत 48 व्या क्रमांकावर आहेत.

कुमार मंगलम बिर्ला

Kumar Manglam Birla

आदित्य बिर्ला समूहाचे  (Aditya Birla Group) अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. त्यानी 13 स्थानांची उडी मारून पहिल्यांदाच या यादीतील टॉप 10मध्ये प्रवेश केला आहे. बिर्ला आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 1,22,200 कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली आहे. या दरम्यान त्यानी दररोज 242 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

जय चौधरी

Jay Chaudhry

आयटी सुरक्षा कंपनी Zscaler चे सीईओ-संस्थापक जय चौधरी (Jay Chaudhry) टॉप 10 सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत सामील झाले आहेत. यादीनुसार, 62 वर्षीय जय चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 14.9 अब्ज म्हणजे सुमारे 1,21,600 कोटी रुपये आहे. ते हिमाचल प्रदेशातील रहिवासी आहेत. सायबर सुरक्षा सेवांच्या वाढत्या मागणीमुळे चौधरींच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान त्याने दररोज 153 कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी तो या यादीत 12 व्या स्थानावर होता. सध्या तो अमेरिकेतील सॅन जोसे येथे राहतात.