मंगळानंतर इस्रोची सूर्यावर स्वारी

२०१९ मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत मोहीम आखणार आहे. 

Updated: Nov 23, 2017, 10:06 PM IST
मंगळानंतर इस्रोची सूर्यावर स्वारी title=

नवी दिल्ली : २०१९ मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत मोहीम आखणार आहे. 

आदित्य - एल १

अवकाश संशोधनातला आपला दबदबा कायम राखत इस्रोने आपलं लक्ष आता सूर्यावर केंद्रीत केलं आहे. २०१९-२०२० या दरम्यान भारताची पहिली सूर्य मोहीम 'आदित्य - एल १' च्या नियोजनाचं सुतोवाच इस्रोचे उपग्रह केंद्र संचालक माइलस्वामी अण्णादुराई यांनी केलयं. 

उपग्रहांचं प्रक्षेपण

इस्त्रो आगामी तीन महिन्यात चार महत्वाच्या उपग्रहांच्या आणि पुढील तीन वर्षांत ७० उपग्रहांच्या प्रक्षेपणाचं नियोजन करते आहे.
सूर्य मोहीमेतल्या उपग्रहाचं वजन ४०० किलो असणार आहे. अवकाशातील लॅगरॅंजिअन पॉंईंट १(एल १) भोवतीच्या हॅलो परिभ्रमण कक्षेत पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर हा उपग्रह सोडण्यात येणार आहे.

महत्वाची घटना

ह्या योजनेला मान्यता मिळाली असून उपग्रहाचं प्रक्षेपण २०१९ - २०२० दरम्यान श्रीहरीकोटा इथून करण्यात येईल. या मोहीमेमुळे सूर्याचा अतिशय जवळून अभ्यास करण्याची संधी आपल्याला मिळेल.