व्हिडिओ: हत्ती, घोडा नव्हे, चक्क क्रेनवरून नवरेदव आला मंडपात

नवरदेवाला मंडपात आणण्यासाठी घेतली क्रेनची मदत

Updated: May 12, 2018, 01:25 PM IST
व्हिडिओ: हत्ती, घोडा नव्हे, चक्क क्रेनवरून नवरेदव आला मंडपात title=

मुंबई : आपल्या देशात लग्नाची एक वेगळीच क्रेझ असते. आपले लग्न सर्वांपेक्षा हटके ठरावे यासाठी हटके शक्कल लढवणारांची तर आपल्या देशात मुळीच कमी नाही. ही मंडळी आपल्या लग्नातील आठवणी संस्मरणीय बनविण्यासाठी इतक्या विचित्र टोकाला जातात की, ते लोकचर्चेचा विषय ठरतात. कधी ही चर्चा सकारात्मक, कौतुकास्पद असते. तर, कधी भलतीच खिल्ली उडवणारी. अशीच चर्चा सुरू झाली एका नवरदेवाच्या हटके एण्ट्रीमुळे. ज्या एण्ट्रीची युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली आहे.

अर्थात हा व्हिडिओ नेमका कोणाचा आणि कुठल्या लग्नातील आहे. तसेच, विवाहस्थळ नेमके कुठले याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. पण, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र, भलताच लोकप्रिय ठरला आहे. या व्हिडिओतील नवरदेव इतरांप्रमाणे हत्ती, घोडा, किंवा महागड्या कारमधून लग्नमंडपात प्रवेश करत नाही. तर, हा नवरदेव चक्क क्रेनवर बसून मंडपात प्रवेश करतो. पहायला काहीसा विचित्र पण तितकाच हटके असा हा प्रकार बघून चर्चा झाली नाही तरच नवल. 

क्रेनच्या पुढच्या बाजूला म्हणजेच ज्या ठिकाणी खोदकाम करण्याची जागा असते त्या ठिकाणी नवरेदव अगदी आरामात बसला आहे. सोबत वऱ्हाडी आणि वाजंत्र्यांचा लवाजमा. क्रेन तर असे सजवले आहे जसे की, एखादी मर्सिडिजच सजवली आहे. व्हिडिओ पाहून असे वाटते की हे काही नवरदेवाने अचानक उचललेले पाऊल नव्हे. तर, त्याने अगदी पूर्वनियोजितपणे हे ठरवून ठेवले. 

व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...