सिंगापूर नाही तर पर्यटनासाठी भारतीयांची 'या' देशाला पसंती!

पर्यटनासाठी श्रीलंकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ होत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 30, 2018, 06:45 PM IST
सिंगापूर नाही तर पर्यटनासाठी भारतीयांची 'या' देशाला पसंती! title=

नवी दिल्ली : पर्यटनासाठी श्रीलंकेत जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ होत आहे. श्रीलंका टुरिझनने मंगळवारी दिलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी सुमारे ३,८४,६२८ भारतीय पर्यटक श्रीलंकेत गेले होते आणि यापैकी ६३.७% लोक फक्त फिरण्याच्या उद्देशाने आले होते. 

श्रीलंका टूरिझन प्रमोशन ब्युरोचे प्रबंध निर्देशक सुतेस बाला सुब्रमण्यम यांनी संमेलनात सांगितले की, श्रीलंकेत येणाऱ्या पर्यटकांपैकी भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. हे लक्षात घेऊन यंदा ४.४० लाख भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. 

रामायणासंबंधित ५० पर्यटन स्थळ

भारतीय पर्यटक श्रीलंकेत प्रामुख्याने पर्यटन, विवाह, हनीमून, धार्मिक पर्यटन या उद्देशाने जातात. श्रीलंकेत बौद्ध धर्माशी निगडीत ऐतिहासिक स्थळं आहेत. तर रामायणासंबंधित सुमारे ५० पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय आकर्षक चौपाट्या, व्हाटर स्पोर्ट्स, आयुर्वेदासंबंधित चिकित्सा पर्यटन हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. 

सर्वेक्षणातून असे दिसते की...

भारतीय पर्यटकांपैकी ४९.८२ % लोक खरेदी करणे, ४१.६४% लोक समुद्र किनारी फिरण्यासाठी तर ३२.७४% लोक ऐतिहासिक स्थळांच्या भ्रमंतीसाठी येतात. तर २१% लोक वाईल्डलाईफला पसंती देतात. भारतीय पर्यटकांपैकी ६९.१% लोकांचा अनुभव सुखद आहे तर ३०.६९% लोक समानाधी आहेत. 

गेल्या ६-७ वर्षांपासून भारतीय पर्यटकांच्या संख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात उत्तर भारतीयांची संख्या ४२% च्या दराने वाढली आहे, असे बालासुब्रमण्यम यांनी सांगितले.