मुंबई : भारतीय रेल्वेने आपला महसूल वाढविण्यासाठी एक अनोखी कल्पना आणली आहे. 'प्रमोशन ऑन व्हील्स' नावाच्या नवीन योजनेंतर्गत गाड्यांना प्रमोशनल कार्यांसाठी बुक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्या अंतर्गत कला, संस्कृती, सिनेमा, दूरदर्शन, क्रीडा इत्यादींच्या जाहिरातींसाठी विशेष गाड्या उपलब्ध करून देण्यात येतील. चित्रपटांच्या प्रमोशनद्वारे भारतीय रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी ही नवी योजना सुरू केली आहे. प्रमोशनसाठी रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. या योजनेला ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ असे संबोधण्यात आले आहे.
For promotion & publicity campaigns, WR & IRCTC runs the first-ever #PromotionOnWheels an 8-coach train to promote #Housefull4. Cast & media will travel by this special train which will leave Mumbai Central for New Delhi today. pic.twitter.com/J1NOqwHcRv
— Western Railway (@WesternRly) October 16, 2019
अभिनेता अक्षय कुमार अभिनीत 'हाऊसफुल ४' संघाच्या निर्मात्यांच्या सहकार्याने आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेने पहिली विशेष 'प्रमोशन ऑन व्हील्स' ट्रेन, सेलिब्रिटी आणि मीडियाकर्स घेऊन चालणारी, बुधवारी मुंबई सेंट्रल येथून सुटेल आणि गुरुवारी नवी दिल्लीला पोहोचेल. या योजनेंतर्गत जाहिरातीच्या माध्यमांतून कला, संस्कृती, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, खेळ इत्यादींच्या प्रचारासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
Railway’s Novel Idea of Promotion on Wheels: A special train will be travelling from Mumbai to Delhi on 16th-17th October, to promote the upcoming film, Housefull 4, along with the film’s team.
I encourage more filmmakers to use this route to reach out to the masses. pic.twitter.com/OLPDqHwwib
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 16, 2019
दरम्यान, चित्रपटाचे प्रमोशन विशेष गाडीद्वारे करण्याची रेल्वेची योजना बुधवारी सुरू झाली आहे. त्यासाठी अक्षयकुमार स्टारर हाऊसफुल फोर या सिनेमाची टीम विशेष गाडीने दिल्लीला रवाना झाली. या विशेष रेल्वेला आठ डबे असतील. ही विशेष रेल्वे गाडी सूरत, वडोदरा, कोटा या महत्वाच्या जिल्ह्यांसह विविध राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींदर भाकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार ही गाडी सूरत, वडोदरा आणि कोटा यासारख्या अनेक राज्यांमधून आणि महत्त्वाच्या जिल्ह्यातून जाईल.
आयआरसीटीसी या प्रचारात्मक गाड्यांना आकर्षक लूक देणे आणि रेल्वेची ही नवी संकल्पना रुजविण्याचे काम हाती घेणार आहे. संपूर्ण देशात ही संकल्पा रुजविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी छोटी शहरे ही प्रमुख शहरांशी जोडणासाठी 'सेवा सर्व्हीस' सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार नऊ रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. या सेवेच्या नऊ गाड्यांपैकी, दिल्ली ते शामली, भुवनेश्वर आणि नयागढ़ शहर, मुरकोंगसेलेक आणि दिब्रूगड, कोयंबतूर आणि पलानी दरम्यान दररोज धावतील. तर अन्य गाड्या वडनगर ते मेहसाना, असारया ते हिम्मतनगर, करूर ते सालेम, येसवंतपूर ते तुमकूर आणि कोयंबतूर ते पोलाची या गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील.