Indian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड

Indian Railways  latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Updated: Jan 4, 2023, 09:05 AM IST
Indian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड  title=
indian-railway

Indian Railways News: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. एक्स्प्रेसने प्रवास करत असाल आणि तुमची गाडी लेट असेल तर तुम्हाला मोठा दिलासा रेल्वेने दिला आहे. आता तुम्ही प्रवास करत असणारी एक्स्प्रेस तीन तासांनी लेट (Train Late More than 3 hrs) झाल्यास तिकिटाचे (Train Ticket) सर्व पैसे रिफंड मिळणार आहेत. एवढच नाही तर नाश्ता-जेवणही फ्री मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव  (Ashwini Vaishnaw) यांनीच ही मोठी घोषणा केली आहे. (Indian Railways Marathi News)

तरीही पूर्ण रिफंड मिळेल

अनेकदा एक्स्प्रेस विविध कारणांमुळे लेट धावत असतात. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात तिकिट रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळत नाही. पण आता यात बदल करण्यात आलाय. एक्स्प्रेस तीन तासांपेक्षा जास्त लेट असल्यास तिकिट रद्द केली तरी पूर्ण रिफंड मिळणार आहे. मग ती तिकिट कन्फर्म असो किंवा मग RAC.तिकिट खिडकीवर काढलेली किंवा ऑनलाईन काढलेली तिकिट असली तरीही पूर्ण रिफंड मिळेल. 

अनेकवेळा गाड्या उशिरा धावतात

हिवाळ्याच्या मोसमात अनेकवेळा धुक्यात गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु अशा परिस्थितीत रेल्वे तुम्हाला अनेक सुविधा देते. मात्र, आता तुमची गाडी तीन तास उशिराने असेल तर तिकीट परताव्याची संपूर्ण रक्कमही परत केली जाणार आहे.

तिकीट रद्द केल्यास संपूर्ण भरपाई दिली जाणार

धुक्यामुळे तुमच्या रेल्वेला 3 तास किंवा त्याहून अधिक उशीर झाल्यास प्रवासी तिकीट रद्द करु शकतात आणि संपूर्ण नुकसान भरपाई मिळवू शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे. तसेच कन्फर्म तिकिटाव्यतिरिक्त, RAC तिकिटावर पूर्ण परतावा देखील दिला जाईल, असे रेल्वेकडून साघण्यात आले आहे.

मोफत जेवण आणि पाणी उपलब्ध

तुम्ही काउंटरवरून किंवा ऑनलाइन तिकीट बुक केल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये, तुम्हाला संपूर्ण परतावा मिळेल. किंवा तुमची ट्रेन लेट झाली तर तुम्हाला मोफत खाण्यापिण्याची सुविधा मिळेल, पण ही सुविधा तुम्हाला काही ठराविक रेल्वेमध्येच मिळेल.

तिकिटाचे पैसे परत कसे मिळणार?

जर तुम्ही काउंटरवर रोख रक्कम भरुन तिकीट खरेदी केले असेल, तर तुम्हाला त्वरित रोख रक्कम मिळेल. किंवा, जर तुम्ही काउंटरवर तिकीट बुक केले असेल आणि डिजिटल मोडमध्ये पैसे दिले असतील तर तुम्हाला पैसे ऑनलाइन मिळतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव  यांनी दिली आहे.