मुंबई : दक्षिण रेल्वेने (Southern Railway) फूल टाईम कंत्राटी वैद्यकीय प्रॅक्टीशनरच्या (Medical Practitioner Recruitment 2021)पदांवर भरतीसाठी अर्ज मागवला आहे. त्याअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पेरंबूर चेन्नईच्या रेल्वे हॉस्पिटलमधील कोविड 19 वॉर्डमध्ये ड्युटी देण्यात येईल. ही भरती कॉन्ट्रॅक्टवर होईल. रेल्वेने यासाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्मचार्यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत, विभागा मार्फत थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांना लवकरच पोस्टिंग मिळेल. इच्छुक उमेदवार सविस्तर माहिती विभागाच्या अधिकृत https://sr.indianrailways.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतात.
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 33 जीडीएमओ (GDMO) पदांवर भरती केली जाईल, त्यांपैकी 17 पदे अनारक्षित, 09 ओबीसी(OBC), 05 एससी (SC) आणि 02 एसटी (ST)प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस MBBS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच ICU आणि व्हेंटिलेटरसह काम करण्याचा अनुभव किंवा डिग्रीनंतर 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 75 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
या पदांसाठी अर्ज करण्याची जास्तीत जास्त वयोमर्यादा 53 वर्षे निश्चित केली आहे. यासह शासकीय नियमानुसार आरक्षित वर्गाला सूट देण्यात येईल.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना नोटिफिकेशन बरोबर दिलेला फॉर्म भरावा लागेल आणि स्कँन कॉपीसह त्यांची सर्व कागदपत्रे या ईमेल पाठवावी covid19cmp20@gmail.com.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 24 एप्रिल 2021
मुलाखतीची तारीख: 28 एप्रिल 2021
या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील आणि त्यांची ऑनलाईन किंवा टेलिफोनिक मुलाखती घेण्यात येतील. उमेदवारांनी सामील होण्यापूर्वी त्यांचे वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र देखील सादर केले पाहिजे.