Indian Railways: फक्त 3500 रुपयांत करा वैष्णोदेवीचं दर्शन, रेल्वेकडून भक्तांसाठी खास ऑफर

तुम्ही आगामी दिवसांमध्ये वैष्णोदेवीला दर्शनासाठी जाऊ इच्छित असाल तर चांगली संधी आहे. रेल्वेकडून (Indian Railways) यात्रेकरुंसाठी खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 3500 रुपये खर्च करावे लागणार आहेत  

Updated: Jan 19, 2023, 04:39 PM IST
Indian Railways: फक्त 3500 रुपयांत करा वैष्णोदेवीचं दर्शन, रेल्वेकडून भक्तांसाठी खास ऑफर title=

Vaishno Devi Darshan News: वैष्णोदेवीला (Vaishno Devi) जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हीदेखील जर आगामी दिवसांमध्ये वैष्णोदेवीला दर्शनासाठी जाऊ इच्छित असाल तर चांगली संधी आहे. रेल्वेकडून (Indian Railways) यात्रेकरुंसाठी खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 3500 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला प्रवासापासून ते राहण्यापर्यंतच्या सर्व सुविधा मिळणार आहे. जाणून घ्या ही योजना आणि सुविधा नेमक्या काय आहेत?

जाणून घ्या सविस्तर माहिती 

- पॅकेजचं नाव - श्री शक्ती फुल डे दर्शन (Shri Shakti Full Day Darshan)
- प्रवासाचं साधन - ट्रेन
- जाण्याची वेळ आणि स्थानक - NDLS/ 19:05 बजे
- क्लास - थर्ड एसी
- जेवण - एक वेळचा नाश्ता 
- राहण्याची सोय - IRCTC चं गेस्ट हाऊस

किती खर्च होणार?

या पॅकेजसाठी किती खर्च करावा लागेल असा विचार तुमच्या मनात आला असेल. कंफर्ट क्लाससाठी प्रत्येक व्यक्तीमागे 3515 रुपये खर्च करावे लागतील. लहान मुलांसाठीही तितकाच खर्च आहे. हे पॅकेज घेतल्यास तुम्हाला श्री शक्ति एक्स्प्रेसने प्रवास करावा लागेल. 

तुम्ही अधिकृत लिंकवर जाऊनही या पॅकेजची पूर्ण माहिती मिळवू शकता

या https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=NDR04 लिंकवर तुम्हाला पॅकेजची पूर्ण माहिती मिळेल. 

हा प्रवास किती दिवसांचा असेल?

पहिल्या दिवशी तुम्हाला दिल्लीहून ट्रेनने कटरा येथे जावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी कटरा पोहोचल्यानंतर तुम्ही वैष्णोदेवीचं दर्शन करु शकता. तिसऱ्या दिवशी तुमचा परतीचा प्रवास सुरु होईल. 

पॅकेजमध्ये काय मिळणार?

- तुम्हाला थर्ड एसीमध्ये ट्रेनमधून प्रवास करण्याची संधी मिळेल
- नाश्ता मिळेल
- लॉकरची सुविधा दिली जाईल
- विश्रांतीसाठी आयआरसीटीसीचं गेस्ट हाऊस मिळेल
- आंघोळ आणि विश्रांतीसाठीही गेस्ट हाऊस दिलं जाईल