Train Ticket Codes: रेल्वेनं (Indian Railway) प्रवास करतेवेळी प्रत्येक वेळी एक नवा अनुभव येतो. या बऱ्यावाईट अनुभवांनीच जणू काही रेल्वेचा प्रवास लक्षात ठेवण्याजोगा होत असतो. अशा या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. काही शब्द, त्यांचे अर्थ लक्षात ठेवणं तुमचा प्रवास सुखकरच करेल यात शंका नाही. बऱ्याचदा रेल्वे तिकीटावर (Railway ticket) काही असे शब्द, अक्षरं असतात ज्यांचा अर्थ काही केल्या लक्षात येत नाही. अशा वेळी मग प्रवासी म्हणून आपली तारांबळ उडते. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या शब्दांविषयी...
WL
WL म्हणजे वेटिंग लिस्ट. रेल्वेमध्ये कमी जागा उरल्या आहेत आणि आरक्षणाची संख्या वाढली आहे, अशी परिस्थिती उदभवल्यास काही प्रवाशांची नावं, त्यांची तिकिटं Confirm न झाल्यास ती वेटिंग लिस्टमध्ये जातात. कन्फर्म तिकिट असणाऱ्यांपैकी कुणी आपलं तिकीट रद्द केलं, तर वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांना जागा मिळतात.
RAC
RAC म्हणजे, रिजर्वेशन अगेंन्स्ट कँसेलेशन (Reservation Against Cancellation). आरएसीचं तिकीट असल्यास संपूर्ण सीटचं आरक्षण नसतं. इथं स्लिपर सीटवर दोन प्रवाशांना सीट शेअर करावी लागते. आरएसी तिकिट असल्यास तुम्ही रेल्वेतून बसून प्रवास करु शकता.
GNWL
General Waiting List, जनरल वेटिंग लिस्टमध्ये तिकिट Confirm होण्याची दाट शक्यता असते. या यादीत नाव असल्यास प्रवासीही निश्चिंत असतात.
RSWL
आरएसडब्ल्यूएल म्हणजे रोड साइड स्टेशन वेटिंग लिस्ट. हे तिकिट असल्यास ते कन्फर्म होण्याची शक्यता धुसर असते. जवळचा प्रवास करण्यासाठी प्रवासी ही तिकिटं काढतात.
RQWL
याचा उल्लेख अगदी शेवटच्या श्रेणीत येतो. RQWL म्हणजे रिक्वेस्ट कोटा वेटिंग लिस्ट. सहसा आरक्यूडब्ल्यूएल एका इंटरमीडिएट स्टेशनपासून दुसऱ्या इंटरमीडिएट स्टेशनपर्यंतच्या अंतरासाठी बुक केलं जातं. आरक्षणासाठी कोणताही पर्याय उरत नाही तेव्हा तिकिट रिक्वेस्ट कोटा वेटिंग लिस्टमध्ये जातं.