Indian Railway: दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत बंपर भरती, ही संधी अजिबात सोडू नका!

Indian Railway Recruitment 2025: अप्रेंटिसशिपसाठी पात्र उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 29, 2025, 06:32 PM IST
Indian Railway: दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत बंपर भरती, ही संधी अजिबात सोडू नका! title=
रेल्वे भरती

Indian Railway Recruitment 2025: गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमध्ये सतत भरती सुरू आहे. आता पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती कक्षाने (RRC) पूर्व मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या एकूण 1 हजार 154 पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती विविध विभागांसाठी आहेत. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

अप्रेंटिसशिपसाठी पात्र उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत निश्चित वेतन देखील दिले जाणार आहे. नोटिफिकेशनुसार पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे या रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकतात.  पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना नोकर भरतीसाठी अर्ज करु शकतात. दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, आयटीआय प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) इत्यादी अपलोड करावे लागेल..

रिक्त पदांचा तपशील 

दानापूरमध्ये 675, धनबादमध्ये 156,पं. दीनदयाळ उपाध्याय स्थानकात 64,सोनपूरमध्ये 47,समस्तीपूरमध्ये 46,प्लांट डेपो (पं. दीनदयाळ) मध्ये 29, वाहन दुरुस्ती कार्यशाळा, हरनौटमध्ये 110
मेकॅनिकल फॅक्टरी, समस्तीपूरमध्ये 27 जागा भरण्यात येणार आहेत.

पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून किमान 50% गुणांसह दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असलेले उमेदवार रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करू शकतात.पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. वयाची गणना 1 जानेवारी 2025 च्या आधारावर केली जाईल. कमाल वयोमर्यादेत, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 10 वर्षे सवलत दिली जाणार आहे. विशिष्ट विभाग/युनिटसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांसाठी तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे अप्रेंटिसशिपसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी मॅट्रिक्युलेशन (किमान 50% (एकूण गुण)) आणि आयटीआय परीक्षेत मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. ज्यामध्ये दोन्ही परीक्षांना समान महत्त्व दिले जाते, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्जाची शेवटची तारीख

पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 साठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. 14 फेब्रुवारी 2025 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.
यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.