रेल्वे प्रवाशांसाठी Good News! नवीन वर्षादरम्यान प्रवाशांना असं मिळणार कन्फर्म तिकीट

या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करू शकतात.

Updated: Nov 20, 2021, 01:51 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी Good News! नवीन वर्षादरम्यान प्रवाशांना असं मिळणार कन्फर्म तिकीट title=

मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रेल्वने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली गोष्ट समोर आली आहे. कारण याकाळानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार हे नक्की. त्यादरम्यान प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी IRCTC ने मध्य रेल्वेच्या सहकार्याने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. रेल्वेच्या अधिकृत निवेदनानुसार, ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी चालवल्या जाणार्‍या विशेष गाड्यांसाठी सीट बुकींग शनिवार, 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय तिकीट ऑनलाइनही बुक करता येणार आहे.

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त धावणाऱ्या विशेष ट्रेनची माहिती

गाडी क्रमांक 01596, मडगाव - पनवेल विशेष ट्रेन

मडगाव ते पनवेल धावणारी ही विशेष गाडी दर रविवारी दुपारी 4 वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 03.15 वाजता पनवेलला पोहोचेल. मडगाव ते पनवेल दरम्यान धावणारी ही विशेष ट्रेन 21 नोव्हेंबर 2021 ते २2 जानेवारी 2022 या कालावधीतच सुरू असणार आहे. त्यानंतर या गाड्या बंद केल्या जातील.

गाडी क्रमांक 01595, पनवेल - मडगाव विशेष गाडी
परत मुंबईला येताना हीच गाडी दर सोमवारी सकाळी 06.05 वाजता पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 06.45 वाजता मडगावला पोहोचेल. पनवेल ते मडगाव दरम्यान ही स्पेशल ट्रेन 22 नोव्हेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंतच चालवली जाईल.

मडगाव ते पनवेल आणि नंतर पनवेल ते मडगाव या दरम्यान धावणारी ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण या दरम्यान धावणार आहे. तर खेड प्रवासादरम्यान माणगाव आणि रोहा रेल्वे स्थानकावर थांबेल.

कोविड-19 नियमांचे पालन करावे लागेल
रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे की, ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी चालवल्या जाणार्‍या या विशेष गाड्यांबद्दल अधिक माहितीसाठी, प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात. याशिवाय, ते NTES ऍप देखील डाउनलोड करू शकतात.

या विशेष गाड्यांमधील प्रवाशांना सर्व कोविड नियमांचे पालन करावे लागेल. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क घालावे लागतील आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करावे लागेल. याशिवाय प्रवाशांना वेळोवेळी हात स्वच्छ ठेवावे लागणार आहेत.