Confirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल

Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी...   

सायली पाटील | Updated: Jan 4, 2024, 03:56 PM IST
Confirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल  title=
indian railway do not make these mistakes if you have confirm ticket

Indian Railway Ticket : भारतीय रेल्वे विभागात मागील काही वर्षांमध्ये अनेक मोठे बदल घडल्याचं पाहायला मिळालं आहे. आधुनिकतेकडे झुकणाऱ्या या रेल्वे विभागानं काही नव्या रेल्वेगाड्याही सेवेत आणल्या. इतकंच नव्हे, तर काही नियमांमध्येसुद्धा बदल घडवून आणले. जगातील चौथ्या आणि आशिया खंडातील दुसरं मोठं रेल्वे जाळं असणाऱ्या भारतीय रेल्वेनं दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. 

Indian Railway ची तिकीटं मिळवणंही अनेकदा कठीण होतं. अशा वेळी प्रवासाच्या बराच काळ आधी तिकीट आरक्षित करत सुखकर प्रवास करण्यालाच अनेकांचं प्राधान्य दिसतं. ज्यामुळं तिकीट कन्फर्म नसताना होणारा मनस्ताप तुलनेनं कमी होतं. पण, तुमच्या एका चुकीमुळं हातची कन्फर्म सीटही जाऊ शकते हे अजिबात विसरु नका. 

हा सारा 10 मिनिटांचा खेळ...

भारतीय रेल्वे विभागाच्या वतीनं आता रिझर्व्हेशन कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीनं एक नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार एखाद्या व्यक्तीकडे Confirm Ticket असेल तर त्या व्यक्तीनं बोर्डिंग स्थानकावर अर्थात तिकीट सुरु होतं त्या स्थानकावर, आपल्या आसनावर 10 मिनिटांच्या आत पोहोचणं अपेक्षित असेल. 

प्रवासी 10 मिनिटांच्या आत सीटवर न पोहोचल्यास त्यांची सीट कोणा इतर व्यक्तीला दिली जाऊ शकते. सध्या टीटीई रेल्वेमध्ये एका यंत्राच्या मदतीनं तिकीट तपासतात. अशा वेळी जर तुम्ही आसनावर गैरहजर असाल तर, टीटीई ती तिकीट रिक्त घोषित करून ती आरएसी किंवा वेटींग लिस्टवाल्या प्रवाशाला देऊ शकतो. 

हेसुद्धा वाचा : क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवर मिळणार 'इतकी' रक्कम

 

सध्या भारतीय रेल्वेमध्ये तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जात आहे. जिथं टीटीई पूर्वी कागदोपत्री व्यवहार करताना दिसत होते, तिथं आता मात्र त्यांची कामं हँड हेल्ड यंत्रानं केली जात आहेत. परिणामी पूर्वी जिथं आसनावर कोणी नसल्यास ती रिक्त घोषित करण्यात वेळ दवडला जात होता तिथं आता मात्र एका क्षणात seat रिक्त असल्याचं निश्चित केलं जातं, जिथं तुम्ही कन्फर्म सीट गमावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं टीटीई येईपर्यंत चुकूनही आसनावरून उठून कुठं जाऊ नका!