Shocking News : चीनमध्ये (China) वैद्यकीय शिक्षण (Medical Student) घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडलीय. त्याचे वय 22 वर्ष होते. तर आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कुटूंबियांना आर्थिक समस्या देखील असल्याने त्याचा मुलाचा मृतदेह भारतात आणण्यात अडचणी येत आहेत.
तामिळनाडूच्या अब्दुल शेख या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा (Medical Student) आजारपणामुळे चीनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 5 वर्षापासून तो ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील किकिहार मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप करत होता. तर आता तो वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षात होता. तो नुकताच भारतात परतला होता आणि 11 डिसेंबरला पुन्हा चीनला गेला होता.
चीनमध्ये आल्यावर त्याला आठ दिवसांसाठी आयसोलेशनवर ठेवण्यात आले होते. यावेळी तो आजारी पडला आणि त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनने शेख कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर शहरात शोककळा पसरली आहे.
अब्दुल शेख याच्या घरची परिस्थीती खुपच बिकट असल्याने त्यांना मृतदेह भारतात आणण्यास खुप अडचणी येत आहेत. त्यामळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह परत आणण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडे (external affair) मदत मागितली आहे. यासोबतच कुटुंबाने तामिळनाडू सरकारकडे मदतीचे आवाहनही केले आहे. आता सरकार त्याची मदत करते का हे पाहावे लागणार आहे.