Viral Video : नवऱ्याची विचित्र अट, नातेवाईकांसमोर नवरीकडे मागितलं KISS, पाहा VIDEO

Viral Video : व्हिडिओत मस्त लग्नाचा माहोल सुरु आहे. नवरा-नवरी (Bride & Groom) लग्नाच्या आऊटफिटमध्ये स्टेजवर उभ्या आहेत.लग्नाच्या अर्ध्या विधी पुर्ण झाल्या आहेत. तर आता दोघांनी हार घालायचे बाकी आहेत. 

Updated: Jan 1, 2023, 08:52 PM IST
 Viral Video : नवऱ्याची विचित्र अट, नातेवाईकांसमोर नवरीकडे मागितलं KISS, पाहा VIDEO title=

Viral Video : देशात लग्नाचा (Wedding) माहोल सुरु आहे. अनेक ठिकाणी लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत. लग्नाच्या वराती निघतायत. सोशल मीडियावर (Social media) देखील लग्नाचा फिव्हर दिसून येत आहे. कारण अनेक लग्नाचे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे.असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत नवऱ्याने (Bride & Groom) नवरीला विचित्र अट घातल्याची घटना घडली आहे. ही घटना पाहून अनेकांना हसू आवरता येत नाही आहे. 

हे ही वाचा : प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

व्हिडिओत काय?

व्हिडिओत मस्त लग्नाचा माहोल सुरु आहे. नवरा-नवरी (Bride & Groom) लग्नाच्या आऊटफिटमध्ये स्टेजवर उभ्या आहेत.लग्नाच्या अर्ध्या विधी पुर्ण झाल्या आहेत. तर आता दोघांनी हार घालायचे बाकी आहेत. हा हार घालायचा विधी होत असतानाच नवरा तिला एक विचित्र अट घालतो. या अटीमुळे त्याचा हा विधी खुपच लांबतो. 

खरं तर हारच्या विधीपुर्वी नवरा तिला एक अट घालतो. या अटीत तो तिच्याकडून भर लग्न मंडपात किस (kiss) मागतो. या किसमुळे तो तिला हारच घालून देत नाही. खुप वेळा तो तिला हार घालूनच देत नाहीत. त्यानंतर ती त्याला गालावर किस करते आणि मग नंतर हा हाराचा विधी पुर्ण होतो. 

सोशल मीडियावर (Social media) सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले की, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांच्या चप्पल खाव्या लागतील. तर दुसऱ्या युझरने लिहिले की, दोघेही खूप क्यूट आहेत. तर एका युझरने यावर राग व्यक्त केला. हे करणे निंदनीय आहे, ही पाश्चात्य सभ्यता आपल्याकडे आणण्याची गरज नाही. 

सोशल मीडियावर (Social media) या व्हिडिओची एकच चर्चा आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.