Indian Hotels For Adults: सगळ्यांनाच सुट्ट्यांमध्ये बाहेर जायायला आवडते. या धावपळीच्या जगात स्वत:साठी वेळ काढणे हे सगळ्यांसाठीच आव्हान झाले आहे. अनेकदा ऑफिसच्या 9 ते 12 तासाच्या शिफ्टमुळे फिरायला जाणे अवघड झाले आहे. जेव्हा आपल्याला सुट्टी मिळते तेव्हा ती सुट्टी घरातील व्यक्तींसोबत घालवतो पण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सुट्टी घालवणे थोडं कठीण होते. जे लोक सिंगल आहेत त्यांना याचा फारसा त्रास होत नाही पण काही कपल्सना मात्र याचा त्रास जाणवतो. (Indian Hotels For Adults Couples are allowed in these hotels in India nz)
तुम्हाला माहितेय का? कॅलिफोर्निया, जमॅका, मालदीव, हवाई, जर्मनी, फ्राँस या सारख्या देशांमध्ये अनेक असे हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत जिथे फक्त कपल्सना प्रवेश आहे. आंनदाची बातमी अशी की आपल्या भारतात ही असे अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत जिथे फक्त कपल्सना (Couples) प्रवेश आहे. आज आम्ही तुम्हाला कपल्स सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन कुठे करु शकतात आणि ते कोणते हॉटेल्स (Hotels), रिसॉर्ट (Resort) आहेत जिथे फक्त कपल्सना प्रवेश मिळणार याविषयी सांगणार आहोत...
The Park Baga River Goa in Goa
द पार्क बागा रिवर गोवा - ही प्रोपर्टी गोव्यातील बागा नदीच्या तटावर आहे. या प्रोपर्टीत 18 वर्षावरील कपल्सना परवानगी आहे. ही जागा त्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे ज्यांना क्वॉलिटी टाइम घालवायचा आहे आणि आंनद घ्यायचा आहे.
Ananda in the Himalayas in Rishikesh, Uttarakhand
आनंदा इन द हिमालायास, ऋषिकेश (उत्तराखंड) - या रेसॉर्टच्या पॉलिसीनुसार इथे 14 वर्षाखालील मुलांना परवानगी नाही. या हॉटेलची खासियत आहे की येथील वातावरण शांत आहे आणि यामुळेच या हॉटेलमध्ये लहान मुलांना परवानगी नाही.
The Tamara Coorg in Madikeri, Karnataka
तमारा कुर्ग, मडिकेरी (कर्नाटक) - निसर्गाच्या मध्यभागी हे हॉटेल वसलेलं आहे. या हॉटेलमध्ये 12 वर्षाखालील मुलांना परवानगी नाही. कपल्स येथील जंगलात ट्रॅकिंग, फॉरेस्ट बाथिंग आणि आउटडोर डाइनिंग चा आंनद घेऊ शकतात.
Vatsyayana - A Himalayan Boutique Resort in Almora
वत्स्ययाना - हिमालयन बुटीक रिसॉर्ट, अल्मोड़ा (उत्तराखंड) - अल्मोडा येथे वसलेल्या या रिसॉर्टमध्ये फक्त 18 वर्षावरील कपल्सना परवानगी आहे. येथे तुम्हाला निसर्ग खूप जवळून पाहता येतो. तुम्ही निसर्गाचा चांगलाच आंनद घेऊ शकता.