Salary Hikes In 2023: जागतिक (Recession) आर्थिक मंदीचे संकेत असताना आणि अनेक मोठ्या कंपन्यांनी (layoffs) नोकरकपात केलेली असतानासुद्धा यंदा (indian companies) भारतीय कंपन्या मात्र कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ (salary hike) देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
ग्लोबल प्रोफशनल सर्विसेज कंपनी एओन हेविट ग्लोबल्सकडून (Aon Hewitt Global ) पगारवाढीसंदर्भात एक नवं सर्व्हेक्षण सर्वांसमोर आणलं आहे. यानुसार 2022 मध्ये सरासरी 10.6 टक्के इतकी पगारवाढ झाली होती. तुलनेनं 2023 मध्ये बरीच आर्थिक संकटं असूनही 10.3 इतकी पगारवाढ अपेक्षित आहे. हा आकडा मागील वर्षीपेक्षा कमी असला तरीही त्यात अंशत: फरक आहे.
40 क्षेत्रांतील तब्बल 1400 कंपन्यांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये 46 कंपन्या यंदाच्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना दोन आकडी Appraisals देण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या लाटेमुळं 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षांमध्ये कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगारवाढ देण्यात आली नव्हती. ज्यानंतर 2022 हे वर्ष परागवाढीच्या दृष्टीनं लाभदायक होतं. आता 2023 मध्येही कंपन्या निराशा करणार नाहीत असंच चित्र आहे.
सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहिती आणि आकडेवारीनुसार टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म आणि उत्पादनांशी संबंधित कंपन्यासुद्धा 2023 मध्ये सरासरी 10.9 टक्के पगारवाढ देणार आहेत. यापूर्वी कॉर्न फेर्री (Korn Ferry)च्या अहवालातूनही 2022 मध्ये 9.2 टक्के पगारवाढ होणार असल्याचं सांगम्यात आलं होतं. त्यानुसार पगारवाढही झाली. 2023 मध्ये त्यांनी 9.8 टक्के पगारवाढीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं यंदाही हे प्रमाण वाढू शकतं असं म्हणायला हरकत नाही.
देशात 2022 मध्ये अनेकांनी नोकरीला रामराम ठोकला. देशात नोकरी सोडणाऱ्यांची संख्या सरासरी 21.4 टक्के इतकी होती. याचीच प्रतिक्रिया म्हणून यंदा पगारवाढीचा आकडा वाढू शकतो असं म्हटलं जात आहे. त्यामुळं तुम्हीही या Appraisal Process मधून जात असाल तर संस्थेकडून किमान चांगल्या पगारवाढीची अपेक्षा ठेवूच शकता.