Cheetah Helicopter Crashes: धक्कादायक! भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, 2 पायलट शहीद

Army’s Cheetah helicopter crashes: नुकतंच जम्मू कश्मिरमध्ये चीता हेलिकॉप्टर कॅश झालं होतं. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे.

Updated: Mar 16, 2023, 06:37 PM IST
Cheetah Helicopter Crashes: धक्कादायक! भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, 2 पायलट शहीद title=
Cheetah helicopter crashes

Army’s Cheetah helicopter crashes: अरूणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) मोठी दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. मंडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याची ( Helicopter Crashes) माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर वैमानिकांची माहिती अद्याप मिळाली नाही. अपघातानंतर भारतीय लष्कराच्या (Indian Army) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धावली असून दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.  (Indian Army Cheetah helicopter crashes near Arunachal’s Bomdila search on for 2 pilots)

नुकतंच जम्मू कश्मिरमध्ये चीता हेलिकॉप्टर (Cheetah helicopter) कॅश झालं होतं. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सेनेच्या हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील (AP) बोमडिलाजवळ ऑपरेशन सॉर्टीसाठी उड्डाण केलं होतं. त्यानंतर चीता हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एटीसीशी संपर्क तुटला. बोमडिलाच्या पश्चिमेला मंडलाजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. त्यात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची आल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्यांनी दिली आहे.

लष्कर आपल्या एकूण लढाऊ विमानमध्ये सुधारणा करण्यासाठी भविष्यात सुमारे 95 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि 110 लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) समाविष्ट करण्याचा विचार करत आहे, असं वक्तव्य लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pande) यांनी केलं होतं.

आणखी वाचा - Surekha Yadav: सोलापुरची कन्या ते वंदे भारत ट्रेनची पहिली महिला लोको पायलट, जाणून घ्या सुरेखा यादव यांचा प्रवास

दरम्यान, चेतक आणि चीता हेलिकॉप्टर बदल करण्याची नितांत गरज असल्याचं मत देखील त्यांनी नोंदवलं होतं. चीता हेलिकॉप्टरची गनना हलक्या हेलिकॉप्टरमध्ये केली जाते. चीता हेलिकॉप्टर हे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. सध्या भारतीय लष्कराकडे 200 चित्ता हेलिकॉप्टर आहेत. त्यात वॉर्निंग सिस्टीम आणि वेदर रडार असल्याने अनेकदा हे हॅलिकॉप्टर दुर्घटनेचा शिकार झाल्याचं दिसून आलं आहे.