नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये शुक्रवारी मोठा अपघात घडता घडता राहिलाय. इथं वायुसेना दिवसाची तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून वायुसेनेच्या एम एल १३० या छोट्या विमानाचा अपघात झालाय. उड्डाण घेतानाच घडलेल्या या अपघातात दोन पायलटनं पॅराशूटच्या मदतीनं उडी घेत आपला जीव वाचवला.
ही घटना बागपतच्या बिनौली भागातील रंछाडच्या जंगलात घडली. दुर्घटनाग्रस्त विमान दोन आसनी आहे. सकाळी अचानक जंगलात दोन आसनी विमान पडताना पाहताना स्थानिक घाबरले.
विमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झालं... आणि बचावकार्य सुरू झालं.
ही घटना सकाळी पावणे दहा वाजता घडली. या घटनेत दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचं सांगण्यात येतंय. या अपघाताचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.